गंगाखेड शहरात चोरीच्या घटनांत वाढ; कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बनला बिकट

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे गंगाखेड शहरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरटे चांगलेच निर्ढावले आहेत. सातत्याने होणाऱ्या चोरीला आळा बसवण्यामध्ये पोलीस यंत्रणा अपयशी झाली असताना, काल रात्री बाजारपेठेमध्ये मोबाईल शॉपी चे दुकान फोडून हजारोंचा माल लंपास करून चोरटे पसार झाल्याची घटना घडल्याने व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गंगाखेड शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा … Read more

सांगली जिल्ह्यामधील शिरगावात एकाच रात्रीत ८ ठिकाणी घरफोड्या

तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे बंद असलेली सात घरे व एक दूध डेअरी अशा आठ ठिकाणी एका रात्रीत घरफोड्या झाल्या आहेत. या घरफोडीत एका रिव्हॉल्वर चोरीसोबत मोठ्या रकमेवर चोरट्यानी डल्ला मारला आहे. या घरफोडीबाबत तासगाव पोलिसात ५० हजार रुपयांचे रिव्हॉल्वर चोरीला गेल्याची तक्रार जितेंद्र पाटील यांनी दिली. असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सांगली येथील श्र्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता.

कामगारानेच ५१ लाखांच्या मुद्देमालावर मारला डल्ला

विटा पोलिसांच्या डीबी पथकाने अतिशय मोठ्या चपळाईने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बंद बंगल्याच्या छताचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून १४५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोलेक्स कंपनीचे १ घड्याळ, स्विसकॉर्न कंपनीची २ घड्याळे रोख ३ लाख असा ५१ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या बिराप्पा बन्ने याला विटा पोलिसानी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३२ लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.

सांगलीत बंद बंगला फोडून, पाच लाखांची घरफोडी

सांगली शहरातील नवीन बायपास रोडवर असणाऱ्या व्यंकटेश सृष्टी मध्ये बंगल्याचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी तब्बल पाऊणे पाच लाख रुपयांच्या दागिन्यांसह, मनगटी घड्याळ लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. याबाबत मिलिंद मछिंद्र लभाने यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

बियर बारचे गेट तोडून विदेशी दारू लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

औरंगाबाद प्रतिनिधी। बिअर बारचे गेट तोडून चोरटयांनी बार मधील रोख रक्कम आणि विदेशी दारूच्या बाटल्या लंपास केल्याची घटना शिऊर बंगला येथे घडली. चोरी करताना चोरटे सिसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे. या घटनेच्या माहितीनुसार, गोकुळ बाबासाहेब सूर्यवंशी यांच शिऊर इथं रेस्टॉरंट आणि बार आहे. हा बार आज पहाटे चार वाजेच्या सुमारास … Read more

जालन्यात सोनसाखळी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना प्रतिनिधी। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सोनसाखळी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे. आकाश उर्फ चोख्या शिंदे, सचिन बाबू गायकवाड आणि राम निकाळजे या तीन सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद केल आहे. या तिघांनी जालन्यात 8 ठिकाणी सोनसाखळी लांबविण्याच्या घटनासह जबरी चोऱ्या व घरफोड्या केल्याचे ही पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या चोरट्यांकडून साडेपाच लाखाचा … Read more

औरंगाबादेत चोरीचे सत्र काही थांबेना, महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडले

औरंगाबाद प्रतिनिधी। औरंगाबादेत चोरीचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. शेतवस्तीतील घरात झोपलेल्या शेतकऱ्यांना दरोडेखोरांनी मारहाण करीत महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री मिसारवाडी भागात घडली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीच वातावरण पसरलय. मिसारवाडी भागात प्रकाश पारगावकर यांची शेती आहे. या शेतीत गजानन सोनाजी सणांसे हे बटाई ने शेती कसतात, शेतात दिवसभराचे काम आटोपून … Read more

आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख पेठ शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. पेठ शहरात दोन दिवसांपूर्वी दोन संशयितांनी. आय.डी.बीआय.बँकेचे ए.टी.एम.मध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून एटीएम मशिन हातोडी व स्क्रुड्रायव्हरने फोडुन रोख रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेबाबत आय.डी.बी.आय. बँक पेठ शाखेचे मॅनेजर श्रीकिरण नंदकिशोर विभांडीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

Breaking | कोल्हापूर अर्बन बँकेला या तंत्राचा वापर करून ६७ लाखांचा गंडा

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेण मुलाणी दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला आॅनकाईन पद्धतीने ६७ लाखांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एचडीएफसी खात्यातून ऑनलाईनद्वारे 67 लाख 88 हजार चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडालीय. आरटीजीएस व एनईएफटी ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करून, संशयिताने अर्बन बँकेला गंडा … Read more