‘त्या’ गोष्टीत रोहित पवारांचे कॅलक्युलेशनचं कच्चं, त्यांनी अभ्यास करून बोलावं; फडणवीसांचा सल्ला

सातारा । एलबीटीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक सल्ला दिला आहे. भाजपनं घाईघाईनं एलबीटी रद्द केल्यामुळं राज्याचं नुकसान झालं असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यावर ‘रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. त्यांनी नीट अभ्यास करून बोललं पाहिजे,’ असं फडणवीस म्हणाले. सातारा जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा … Read more

बबड्याची सीरिअल पाहण्याऐवजी ‘हे’ केलं असत तर… रोहित पवारांनी शेलारांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अंतिम वर्षाच्या परीक्षा व्हायलाच हव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकार वर निशाणा साधला आहे. भाजपा नेते  आशिष शेलार यांनी काल खोचक शब्दांत सरकारवर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शेलारांना त्याच भाषेत सुनावलं आहे. करोनाच्या संकटात परीक्षा घेता येणार नाहीत, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारनं सुरुवातीपासूनच … Read more

ठाकरे सरकारवरील ‘त्या’ भाजप नेत्याच्या टीकेला रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले..

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर आता सर्व राज्यांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार हे स्पष्ट झालं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ”आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर … Read more

महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याच्या ‘उदात्त’ कार्याबद्दल भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’- रोहित पवार

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय सुनावला. त्यांनतर भाजप नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी केल्याच्या ‘उदात्त’ कार्याबद्दल भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’ असं म्हणतं रोहित पवार यांनी ट्विट … Read more

सुशांतची हत्या झाली म्हणता आणि पुरावेही देत नाही? रोहित पवारांनी भाजपला घेतलं फैलावर

अहमदनगर । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून भाजप नेत्यांच्या दाव्यांचा चांगलाच समाचार घेतला.” सुशांतसिंह राजपूत यांची हत्या झाल्याचं तुम्ही म्हणता आणि पुरावेही देत नाही. भाजपकडे जर या प्रकरणातील पुरावे असतील, तर त्यांनी ते महाराष्ट्र सरकार व पोलिसांना द्यावेत. पुरावे नसताना ते गंभीर आणि मोठी वक्तव्ये करत असतील, तर ते राजकारण करीत … Read more

‘तू ही राम आणि मी ही राम’ रोहित पवारांचे ‘राम’ नामाचे ट्विट प्रचंड व्हायरल

पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. दरम्यान, अयोध्येत आज होत असलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जबरदस्त ट्वीट करत श्रीरामाकडे एक प्रार्थना केली आहे. सर्वांना सन्मती दे… अशी प्रार्थना रोहित पवार यांनी श्रीरामाकडे केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये … Read more

रोहित पवारांनी कोरोना यौद्धांसोबत साजरा केला रक्षाबंधन; दिली ‘ही’ ओवाळणी

पुणे । आमदार रोहित पवार यांचे ससून येथील महिला कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले. कोरोना वॉरियर्ससोबत रक्षाबंधन साजरा केल्यानं महिला कर्मचारी देखील यावेळी भावूक झाल्या. ससून येथील महिला कर्मचाऱ्यांनी आमदार रोहित पवार यांना राखी बांधत औक्षण केलं. यावेळी सॅनिटायझर, मास्कची रोहित पवारांकडून ओवाळनी देखील कोरोना यौद्धांना देण्यात आली. कोरोना वॉरियर्सचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असा देखील … Read more

रोहित पवारांचं अनोख रक्षाबंधन, रुग्णालयात सेवा करणाऱ्या बहिणींचा घेतला आशीर्वाद

पुणे | आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीदेखील आजचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत बहीण-भावाच्या नात्याचं एक सुंदर उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं आहे. रोहित पवार यांनी आज ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट दिली आणि रुग्णालयातील नर्ससोबत रक्षाबंधन साजरं केलं आज भाऊ-बहीणीच्या पवित्र नात्याचा दिवस आहे. … Read more

चंद्रकांतदादांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! रोहित पवारांनी काढला चिमटा

पुणे । विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०५ आमदार निवडून आल्यानंतरही राज्यातील सत्तेने हुलकावणी दिल्याने भाजप नेत्यांमधील अस्वस्थता पावलोपावली दिसत असते. त्यातूनच एखाद्या नेत्याचं विधान येतं आणि मग त्यानंतर महाविकास विरूद्ध भाजपा यांच्यात कलगीतुरा बघायला मिळतो. काल मंगळवारी अचानक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यास तयार असल्याचं विधान केलं होतं. या विधानावरून कर्जत जामखेड मतदारसंघाचे … Read more

इथं विषय चाललाय काय, आपण बोलताय काय! रोहित पवार आणि भाजप नेत्यात ट्विटवर शाब्दिक बाचाबाची

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळं विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार आणि भातखळकर यांच्यात ट्विटवर वॉर सुरु झालं आहे. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? घरी बसल्याबद्दल सर्वाधिक चर्चा राज्यात कुणाबद्दल चालली आहे ते ठाऊक … Read more