अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा- सचिन सावंत

सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे माहिती दिली होती. राऊत यांच्या माहितीवर सचिन सावंत यांनी काँग्रसेची भुमिका मांडत शिवसेनेला उपरोधक टोला लगावला.

शिवसैनिकाने जोपासला अनोखा छंद; जतन केले पंचवीस वर्षातील सामनाचे सर्व अंक

4 जुलै 1989 पासून ते आजपर्यंत यांनी दैनिक सामनाचे अंक जतन करून ठेवले आहेत. 23 जानेवारी 2012 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची रुद्राक्षतुला करणेत आली त्यावेळी 62 किलो रुद्राक्षांची संख्या 22234 अशी होती. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादीरुपी हे रुद्राक्ष महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वितरित करण्यात आली. महेश पाटील यांनी मुंबई ला जाऊन दोन रुद्राक्ष घेतले असुन आजही ते भकतीभावाने जपुन ठेवले आहेत. शिवसेना प्रमुखांच्या 1994 ते 2010 पर्यत दसरा मेळाव्यातील झालेल्या भाषणाच्या कॅसेट ही त्यांचेकडे आहेत.

पुण्यात आधी ‘आफ्टरनून लाइफ’ सुरू करायला हवं – आदित्य ठाकरे

पुण्याचे लोक दुपारी झोपतात. या प्रचलित समजावर आदित्य ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी दिसू नये या मागे राजकीय षडयंत्र आहे काय?; संजय राऊत यांचा सवाल

मुंबई : दरवर्षी प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ सादर केला जातो. यावेळेस मात्र महाराष्ट्राच्या चित्ररथाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आहे. महाराष्ट्राबरोबरच पश्चिम बंगालच्या चित्ररथाचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांनी ट्विटरवरून म्हंटले की, महाराष्ट्र आणि प.बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसु … Read more

शिवथाळीसाठी आधार कार्ड गरजेचे, ही केवळ अफवा- मुख्यमंत्री

शिवथाळीचा योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीची सक्ती करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले असून ही केवळ अफवा असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ठाकरे सरकारच्या महत्वाकांशी शिवथाळी योजनेत गोरगरिबांना सवलतीच्या दरात जेवण दिले जाणारा आहे. या जेवणाची किंमत केवळ १० रुपये ठेवण्यात आली आहे.

‘नाइट लाईफ’वर टीका करणारे प्रदूषित मनाचे; आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

मुंबई : नाईट लाईफवर टीका करणारे प्रदूषित मनाचे असल्याची घणाघाती टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. नाईट लाईफचा प्रयोग अनेकांना रोजगार मिळवून देणारा आहे. शुद्ध हेतूनं सुरू होणाऱ्या या प्रयोगावर टीका करणाऱ्यांची मनं प्रदूषित आहेत,’ अशी टीका आदित्य यांनी केला आहे. नाईट लाईफ सुरु झाल्यानंतर निर्भयासारख्या हजारो घटना घडतील अशी टीका भाजप नेते … Read more

”शिवसैनिकांनो मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन उद्या मुंबईत पार आहे. हे अधिवेशन मनसेला दिशा देणारं ठरणारं आहे. उद्याच्या अधिवेशनानंतर मनसे हिंदुत्ववादाची कास धरणार असल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतांना मसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसैनिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्याचं आवाहन केलं आहे. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा असं आवाहन करणारं ट्विट त्यांनी केलं आहे.

‘नाइट लाइफ’ला भाजप नेत्याचा विरोध; म्हणे मद्यसंस्कृती वाढून महिलांवरील अत्याचारात वाढ होईल

मुंबई ‘नाइट लाइफ’च्या प्रस्तावाला सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदोबस्ताबाबत पोलिसांनी अद्याप तयारी केलेली नाही. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून नाइट लाइफचा प्रारंभ अशक्य आहे’, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान आता या नाइट लाइफच्या प्रस्तावाला भाजप नेते राज पुरोहित यांनी विरोध दर्शवला आहे.

साईबाबा जन्मस्थळाचा वाद संपुष्टात; मुख्यमंत्र्यांनी ते विधान मागे घेतलं

साईबाबा जन्मस्थळावरून सुरु झालेल्या वाद आता संपुष्टात आला आहे. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले व त्यास पाथरी व शिर्डीकरांनी संमती दिल्याने वादावर पडदा पडला आहे.

सत्तेचा प्रस्ताव देताना कोण होत त्यांची नावं उघड करावी; शिवसेनेचे पृथ्वीराज चव्हाण यांना आवाहन

पृथ्वीराज चव्हाण यांना हा प्रस्ताव कोणी आणि कधी दिला हे माहिती नाही. हा प्रस्ताव देताना चर्चेसाठी कोण उपस्थित होतं त्यांची नावं उघड केली जावीत. याबद्दल पृथ्वीराज चव्हाणच जास्त माहिती देऊ शकतात,” असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.