सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली उडी, म्हणाले..

मुंबई । आधी मुंबई पोलीस, बिहार पोलीस, ईडी, CBI यानंतर आता महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात उडी घेतली आहे. राज्य मानवाधिकार आयोगाने रिया चक्रवर्तीच्या कूपर हॉस्पिटलच्या शवागृहात जाण्यावरुन नोटीस बजावली आहे. कोणत्या नियमाच्या आधारे रिया चक्रवर्तीला शवागृहात जाण्याची परवानगी देण्यात आली? नियमानुसार रक्ताचा नातेवाईक असलेली व्यक्तीच पार्थिवाजवळ जाऊ शकते, मग पोलिसांनी रियाला … Read more

मृत्यूच्या दिवशी सुशांत ‘त्या’ ड्रग्ज डिलर सुशांतला का भेटला? सुब्रमण्यम स्वामींचा सवाल

नवी दिल्ली ।  अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्या प्रकरणी दर दिवशी नवं नवे खुलासे होत असतानाच आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक महत्त्वाचा आणि सर्वांच्या भुवया उंचावणारा गौप्यस्फोट केला आहे. ‘ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला त्या दिवशी तो दुबईतील ड्रग डिलरला भेटला होता’, असा दावा स्वामी यांनी ट्विट करत केला आहे. … Read more

सिध्दार्थ पिठाणीने सुशांत आणि रियाच्या नात्याबद्दल केला ‘हा’ मोठा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सीबीआयने अलीकडेच सिद्धार्थ पिठाणीची चौकशी केली आहे. सिद्धार्थने सुशांतबाबत सीबीआयसमोर मोठे खुलासे केले आहेत. अहवालानुसार सिद्धार्थ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की 2019 नंतर सुशांतच्या आयुष्यात गोष्टी बदलू लागल्या, सुशांतचे काम गेल्या वर्षी ऑगस्टपासून थांबले होते.आणि त्याने रिया चक्रवर्तीसोबत जास्त वेळ घालवायला सुरुवात केली. पण त्यानंतर अशीही एक … Read more

रैनाला आली सुशांतची आठवण ; शेअर केला हा ‘भावुक’ व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान इंडियन प्रीमियर लीग युएईमध्ये खेळली जाईल. आयपीएलच्या 13 व्या सत्रातील सर्व संघ युएईमध्ये पोहोचले आहेत. यावेळी खेळाडू एकट्याने व्यायाम करत आहेत, संगीताचा आनंद घेत आहेत किंवा व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधत आहेत. याचदरम्यान, भारताचा आक्रमक फलंदाज सुरेश रैनाला दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत … Read more

….म्हणून सुशांत होता नाराज ; प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन आता बरेच दिवस झाले मात्र दररोज या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत असते. . यामध्येच आता ‘छिछोरे’चं क्रेडिट न मिळाल्यामुळे सुशांत नाराज झाला होता, असं प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी म्हटल्याचं वृत्त समोर आलं आहे. बॉक्स ऑफिसवर ‘छिछोरे’ या चित्रपटाने चांगली कमाई केली. चित्रपट … Read more

13 जूनला कोणतीही पार्टी झाली नाही ; उलट….सुशांतच्या शेजाऱ्यांचा धक्कादायक खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या हाती जाताच हाचलाचींना वेग आला. चौकशीच्या या सत्रात काही मधक्कादायक खुलासे होऊ लागले. मागील 2-3 दिवसात सीबीआय तपासानं चांगलाच वेग पकडल्याचं पाहायला मिळालं. यातच आता सुशांतच्या इमारतीतील त्याच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच 13 … Read more

राज्य सरकारने ‘त्या’ प्रकरणात आधीच शहाणपणा दाखवायला हवा होता- राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर । माजी मंत्री व भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. पण सरकारने जनतेचे लक्ष विचलित करून सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे … Read more

सुशांतसिंह हत्याप्रकरणाच्या CBI तपासाला वेग; एम्सच्या डॉक्टरांकडून पोस्टमोर्टम रिपोर्टची तपासणी

मुंबई । सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला वेग आला असून सीबीआयकडून सुशांत सिंहच्या पोस्टमोर्टम रिपोर्टची तपासणी करण्यात येणार आहे. सीबीआयने शुक्रवारी सुशांतच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी एम्समधील फॉरेन्सिक विभागाची मदत मागितली. सीबीआयने एम्सला पाठवलेल्या पत्रात वैद्यकीय कागदपत्रं, शवविच्छेदन अहवाल, व्हिडीओ तसंच गरज असणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या जातील असं सांगितलं आहे. एम्सचे डॉक्टर मुंबईत येण्याचीही शक्यता आहे. … Read more

सीबीआयची टीम सुशांतच्या मुंबईतील वांद्रे इथल्या घरी दाखल

मुंबई । सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला वेग आला असून सीबीआयची टीम आज सुशांतच्या वांद्रे इथल्या घरी पोहोचली आहे. याच घरात सुशांतसिंहचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या भेटीत या प्रकरणातील काही धागेदोरे सापडतात का यासाठी सीबीआय कसून तपासणी करणार आहे. शुक्रवारी सकाळी सीबीआयनं सर्वातआधी सुशांतच्या स्वयंपाकी निरजची चौकशी केली होती. त्याचा जबाब नोंदवून घेण्यासाठी … Read more

सुशांत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी CBIच्या ५ टीम लागल्या कामाला; क्राईम सीन रिक्रिएट करणार

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाचे पथक कामाला लागले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांच्या पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी एक टीम मृत्यूप्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी वांद्रे पोलीस स्थानकात पोहचली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईतील गेस्ट हाऊसवर चौकशी सत्राला प्रारंभ झाला … Read more