व्यापा-याचे घर फोडणारे तिघे अटकेत; लॅपटॉप, एलईडी जप्त  

theft

औरंगाबाद : व्यापा-याचे घर फोडून चोराने रोख, लॅपटॉप व एलईडी लांबवला. हा प्रकार बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एन-२, ठाकरेनगरातील महालक्ष्मी चौकात घडला होता. मुकेश महेंद्र साळवे, उमेश महेश गवळी, अक्षय डोके आणि आकाश आठवले उर्फ जाधव अशी घरफोड्यांची नावे आहेत. त्यापैकी पोलिसांनी मुकेश साळवे आणि उमेश गवळी यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एलईडी आणि … Read more

रेल्वे प्रवाशाचा मोबाईल चोरणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

औरंंगाबाद | रेल्वे प्रवाशाचा मोबाइल चोरणा-या शाहीद आलम मोहम्मद हारुण (वय २१, रा. गिधा, चौबेटोल ता; चनपटीया जि. पश्चिम चंपारण बिहार,ह.मु.औरंगाबाद) याला लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले असून त्याची हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रूहिना अंजूम यांनी दिले आहेत. अटकेत असेला शाहीद आलम मोहम्मद हारूण हा समृध्दी महामार्गाच्या कामावर क्रेशर चालविण्याचे … Read more

दीड एकरवरील कांद्याचे पीक चोरट्यानी केले लंपास

औरंगाबाद | पावसाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकरी संकटात सापडलेला आहे. कसेबसे पिकांना वाढविले, मात्र तोंडी आलेले पीक आता चोरटे लंपास करीत असल्याने निसर्ग पिकू देईनात आणि चोरटे विकू देईनात, अशी अवस्था शेतक-यांची झाली आहे. अशीच घटना गंगापूर तालुक्यात घडली आली आहे. दीड ते दोन लाख रुपये किंमत असलेल्या शेतातील दीड एकरवरील कांद्याचे उभे पीक रातोरात चोरट्यानी … Read more

पुण्यात चोरांना पाहून पोलिसांनीच काढला पळ, पहा घटनेचा CCTV व्हिडिओ

पुणे । सोसायटीमध्ये पाच फ्लॅटमध्ये चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांना पाहून गस्तीवरील पोलीसच पळून गेल्याचा प्रकार सीसीटीव्हीमुळे उघड झाला आहे. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली. औंध चोरी प्रकरणी पोलीस शिपाई अनिल अवघडे आणि पोलीस हवलदार प्रवीण गोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस खात्याची प्रतीमा मलीन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर … Read more

चोरट्यांनी दीड लाखांची तब्बल २१ बोकडे पळवली

सांगली । सांगली शहरातील शामरावनगर परिसरात असणाऱ्या एका गोडाऊनमध्ये बांधून ठेवलेली दीड लाख रुपयांची २१ बोकडे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी इलियास हमीद रहिमतपूरे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. चोरट्यांनी चक्क २१ बोकडे लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. इलियास रहिमतपुरे यांचे मटण दुकान आहे. ते पेठभाग येथील खाटीक … Read more

गर्लफ्रेंडची हौस पुरवण्यासाठी तरुणाचा आपल्याच मावशीच्या दागिन्यांवर डल्ला

कोल्हापुर । प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी तरुणाने आपल्याच मावशीच्या दागिन्यांवर डल्ला (Robbery At Aunts House) मारल्याची घटना कोल्हापूरच्या कालगमध्ये घडली. पोलिसांनी अवघ्या ४ तासातच या तरुणाच्या मुसक्या आवळल्या. चोरी केलेले दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे २ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला (Robbery At Aunts House). संशयित 20 वर्षीय तरुण वंदूर येथील आपल्या मावशीकडे नेहमी ये-जा … Read more

पिंपरी : आलिशान कार चोरणारा आरोपी गजाआड

सर्व्हिसिंगसाठी आलेली आलिशान कार बावधन येथून चोरण्यात आली होती . या गुन्ह्यातील आरोपीस नुकतीच गोव्यातून अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कामगिरी केली. वसिम कासिम सय्यद (वय ३२, रा. गुगल हौसिंग सोसायटी, मडगाव, गोवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विकास परदेशी यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धुळे : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चोरटयांनी सोन्याचे दागिने केले लंपास

शहरातील चाळीसगाव रोड जवळील कॉलनीतील घरात घुसून भरदिवसा दोन तोळे सोन्यांचे दागिने लंपास केले आहेत . पितळ , चांदी आणि सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करुन देतो असा बहाणा करून या चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवला आणि हातचलाखीने दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत .

बस स्थानकावर तीन तोळे सोने चोरीला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जतला पाहुण्यांकडे जाताना सांगली-जत  बसमधे महिलेची पर्स चोरून त्यातून ३ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि ४५०० रुपये रोख असा १ लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना आज दुपारी सांगली बस स्थानकावर घडली. इस्लामपूरच्या असणाऱ्या रेखा ऐवळे या जतला पाहुण्यांकडे जाण्यासाठी इस्लामपूरहून सांगलीला आल्या होत्या. त्या जतला जाण्यासाठी सांगली-जत या बस मध्ये बसत … Read more

चोरट्याच्या घरातून चार लाखांची चांदी जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे चेन्नई येथील एका दुकानात गलाई कामगार म्हणून काम करीत असलेल्या जत तालुक्यातील एकाने आपल्या अन्य तीन साथीदारांसह २८ किलोची चांदी चोरून पोबारा केला होता. चेन्नई पोलीस आणि उमदी येथील पोलिसांनी त्यातील एका आरोपीच्या लवंगा येथील घरावर छापा टाकून सुमारे चार लाखांची १० किलोची चांदी ताब्यात घेतली, मात्र आरोपी मिळाला नाही. … Read more