मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न दिल्यास आम्ही विरोध करू ; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण

नवी दिल्ली : सावरकरांनी इंग्रजांकडे मागितलेल्या माफीचा इतिहास नष्ट करता येणार नाही. अशा परिस्थितीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न दिला तर आम्ही निषेध करू, तसेच त्याचा विरोध करू, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले की, सावरकर हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व … Read more

कर्नाटक पोलिसांची मुजोरी; राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना धक्काबुक्की करत घेतलं ताब्यात, वाचा सविस्तर रिपोर्ट

कोल्हापुर हॅलो महराष्ट्र प्रतिनिधी, सतेज औंधकर : सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना बेळगाव पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. यानंतर बेळगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला आहे. राज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगावात हुतात्मा चौकात होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमात सहभागी … Read more

संजय राऊतला सत्तेचा माज चढलाय, त्याच मानसिक संतुलन बिघडलंय – नारायण राणे

टीम हॅलो महाराष्ट्र : संजय राऊत या माणसाला सत्तेचा माज चढलाय, त्याच मानसिक संतुलन बिघडलंय, अशी जोरदार टीका खासदार नारायण राणेंनी केली आहे. भावाला मंत्रिपद मिळालं नाही तेव्हापासून राऊत अशी वक्तव्य करत असल्याचे राणे यांनी सांगितले. छत्रपती आमचं दैवत आहे, आमच्या देवतांबद्दल, त्यांच्या घराण्याविषयी वेडंवाकडं बोलला तर जीभ जाग्यावर राहणार नाही, याद राखा असा इशाराही … Read more

संभाजी भिडे यांचे उद्या सांगली बंदचे आवाहन; संजय राऊतांना पदावरून हटवण्याची मागणी

सांगली | उदयनराजेंनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद सातारा, सांगली भागात पडताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शुक्रवारी (17 जानेवारी) सांगली बंदचं आवाहन केलं आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर … Read more

साईबाबांच्या जन्मभूमीचा वाद पेटला; जन्मभूमीच्या विकासासाठी घोषित झालेला निधी पाथरीला की शिर्डीला?

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी, गजानन घुंबरे : महाराष्ट्र शासनाकडून साईजन्मभूमीच्या विकासासाठी शंभर कोटींच्या निधीची घोषणा झाल्यावर साईजन्मभूमी म्हणुन पाथरीच्या विकासाला शिर्डीवासीयांनी विरोध दर्शविला आहे. पाथरीकरांनी मात्र जन्मभूमी असल्याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत यावर वाद नको म्हणत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. या संदर्भात पाथरीमध्ये आज ग्रामस्थ, विश्वस्त आणि कृतिसमितीने बैठक घेतली. यामध्ये साईबाबांच्या कर्मभूमी शिर्डी प्रमाणेच जन्मभूमी पाथरीचा … Read more

भविष्यात संजय राऊत यांनी विचारपूर्वक विधाने करावीत – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

टीम हॅलो महाराष्ट्र : भारतरत्न इंदिराजी गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे, पण भविष्यात संजय राऊत यांनी विचारपूर्वक विधाने करावीत, अशा शब्दांत महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत यांना सुनावले. तसेच आमच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही हे सर्वांनीच लक्षात … Read more

समुद्रावरील सर्वात जास्त लांबीच्या पुलाच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज १५ जानेवारी रोजी मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या(मुंबई ट्रान्स हार्बर लिंक)समुद्रातील पुलाच्या पहिला गाळा उभारणी कामाचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,खासदार अरविंद सावंत,आमदार अजय चौधरी उपस्थित होते. या पुलाची लांबी २२ किमी असून हा देशातील समुद्रावरील सर्वात जास्त लांबीचा पूल ठरणार आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये … Read more

वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना बकरी सारखी झाली – रामदास आठवले

सातारा : वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना आता बकरी सारखी झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सातारा दौऱ्यावर असताना आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले की, स्वातंत्र्य वीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी फार कठोर भूमिका घेतली होती. यावर मात्र शिवसेनेने तडजोडीची भूमिका घेतली आहे. सत्तेसाठी शिवसेना गुलामगिरी करत आहे. … Read more

हे जनतेचे नव्हे, पिता पुत्राचे सरकार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हे पिता पुत्राचे सरकार आहे. हे जनतेचे सरकार नाही. जर आज हा मंत्रिमंडळ … Read more

हम मांगने वाले नही, हम देने वाले है; पक्षावर नाराज नसल्याचे संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : मी आणि माझे कुटुंब नेहमीच पक्षाशी एकनिष्ठ आहोत. मी नाराज असल्याच्या अफवा आहेत, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळात विस्तारात संजय राऊत गैरहजर राहिल्यामुळे संजय राऊत पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना मंत्रिपद न दिल्यामुळे संजय राऊत नाराज असल्याचे … Read more