हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होते आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहेच पण त्याबरोबरच एक समाधानकारक बाबही समोर आली आहे. देशातील वाढत्या रुग्णांसोबत देशातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही चांगले दिसून येते आहे. देशातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६२% इतके आहे. जे कार्यरत रुग्णांच्या प्रमाणात अधिक आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली आहे.
जगाची कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ११ लाख पार गेली आहे तर देशातील रुग्णसंख्येने ७ लाख ही संख्या पार केली आहे. भारताची रुग्णसंख्या आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. असे असले तरी देशातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत चांगले असल्याचे दिसून आले आहे. देशातील मृत्यूदरही इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचा दिसून आला आहे.
दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील मिशन बिगिन अगेन सुरु झाले असून राज्यातील कामकाज हळूहळू सुरु केले जात आहे. सर्वकाही सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.