औरंगाबादकरांसाठी अनलॉक ठरले अनलकी; ५ हजार ५१० ने वाढली रुग्णसंख्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद मध्ये कोरोनाचे आगमन झाले ७ मार्च पासून. ७ मार्च ला संशयीत रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून कोरोनाने शहरात जाळे पसरविणे सुरू केले. त्यानंतर लॉकडाऊनचा पहिला टप्पा २५ मार्च पासून सुरू झाला. त्यानंतर चार टप्प्यात लॉकडाऊन करून १ जून पासून अनलॉक १ आणि अनलॉक २ सुरू झाले. पण याच काळात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे अनलॉक औरंगाबादकरांसाठी अनलकी ठरले की काय? असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहेत.

शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा पहिल्या टप्प्यातील कोरोनाचा अहवाल पहिला तर बोटावर मोजण्याइतपत रुग्णसंख्या होती. मात्र तीच रुग्णसंख्या आज ७ हजार १७ वर जाऊन पोहचली आहे. यामुळे चिंता आणखी वाढली आहे. आणि संपुर्ण लॉकडाऊन आणि अनलॉक चा विचार केला तर रुग्णसंख्या ही अनलॉक १ आणि अनलॉक २ मधेच सर्वाधिक वाढल्याचे समोर आले आहेत.

लॉकडाऊनच्या पहिला टप्पा: रुग्णसंख्या २४ वर

औरंगाबाद शहरात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण ७ मार्च ला आढळून आला. त्यानंतर १० मार्च ला त्या रुग्णांस श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. १३ मार्च ला स्वब तपासणी करून १५ मार्च रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आणि तेव्हापासून औरंगाबाद मध्ये कोरोनाचे आगमन झाले. त्यानंतर या रुग्णसंख्येत भर पडली. १० एप्रिलपर्यत कोरोनाची रुग्णसंख्या ही २० वर गेली आणि औरंगाबाद शहर हे रेड झोन मध्ये आले. २५ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजेपासून ते १४ एप्रिल असा २१ दिवसांचा लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरू झाला. या पहिल्या टप्प्यात २५ मार्च ला कोरोनाची रुग्णसंख्या ही १५ वर होती. तर या २१ दिवसात १४ एप्रिलपर्यंत २४ वर जाऊन पोहचली. आणि कोरोनामुळे दोन मृत्यू देखील झाले.

लॉकडाऊन दुसरा टप्पा; रुग्णसंख्या २८२ वर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकदाऊनचा कालावधी वाढविण्यात आला. त्यात दुसरा टप्पा हा १४ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान करण्यात आले. या काळात १४ एप्रिल पर्यत २४ रुग्णसंख्या होती ती ३० एप्रिल पर्यत १५१ वर जाऊन पोहचली. त्यानंतर ३१ ते ३ मे पर्यत कालावधी वाढविण्यात आला. ३ मे पर्यत कोरोनाची रुग्णसंख्या ही २८२ वर गेली. आणि कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या ही ७ वर गेली.

लॉकडाऊन तिसरा टप्पा; रुग्णसंख्या ९५८ वर

लॉकडाऊनच्या काळात तिसरा टप्पा हा ४ मे पासून सुरू झाला. १७ मे पर्यत या लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ही ९५८ वर गेली. ४ मे पर्यत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही २८२ वर होती तर मृत्यू होण्याची संख्या १० वर होती. तर १७ मे ला ९५८ वर रुग्णसंख्या झाली तर मृत्यू होण्याची संख्या ३० वर गेली.

लॉकडाऊन चौथा टप्पा; रुग्णसंख्या १५४० वर

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्पा हा १८ मे ते ३१ मे दरम्यान करण्यात आला. या टप्प्यात कोरोनाचा अहवाल पाहिला तर या काळात औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ही १५४० वर जाऊन पोहचली. १८ मे रोजी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही १०२१ एवढी होती. तर मृत्यू ची संख्या ३४ वर जाऊन पोहचली. या चौथ्या टप्प्यात ३१ मे दरम्यान १५४० वर रुग्णसंख्या गेली. तर मृत्यूची संख्या ही ७० वर गेली.

अनलॉक-१ व २; रुग्णसंख्या ७०९७ वर

१ जून पासून अनलॉक १ आणि अनलॉक २ सुरू झाले. यामध्ये याच काळात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली. त्यामध्ये १ जून रोजी कोरोना रुग्णांची संख्या ही केवळ १५८७ वर होती. ती आज ७ तारखेला ७०९७ वर जाऊन पोहचली आहे. म्हणजे या अनलॉक काळात ५ हजार ५१० ने रुग्णसंख्या वाढली. तर कोरोनामुळे मृत्यू होण्याचा अहवाल पाहिला तर १ जुन पर्यत ७८ जणांचे मृत्यू झाले होते. तर हीच संख्या आज ३१८ वर जाऊन पोहचली आहे. म्हणजे २४० रुग्णांचा मृत्यू या अनलॉक काळात झाले आहेत. यामुळे अनलॉक हे औरंगाबादकरांसाठी अनलकी ठरले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.