काय होते तुम्ही काय झाला तुम्ही? रोहीत पवारांचे नारायन राणेंना खणखणीत प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी मुंबईतील भाजपा मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे म्हण्टले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी खणखणीत उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून काय होते तुम्ही काय झाला तुम्ही? असा प्रश्न करत नारायण राणेंना सुनावले आहे.

‘नारायण राणे साहेब महाविकास आघाडीत मतभेद आहेत असे आपण म्हणालात, पण मतभेद हे जिवंत लोकशाहीचं तर आदेश हे हुकूमशाहीचं लक्षण आहे. इथं प्रत्येकजण मत मांडतो. त्यातून मतमतांतरं होत असतात, फक्त त्याला तुम्ही मतभेद असं नाव दिलं. कारण तुमच्याकडं चर्चेची नाही तर एकानेच निर्णय घेण्याची पद्धत आहे.  दुसरं म्हणजे मला माहित असलेले राणे साहेब सामान्यांच्या प्रश्नावर प्रचंड आक्रमकपणे मुद्देसूद बोलणारे होते. तेच आज लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचत असल्यासारखे वाटले.’ असे ट्विट केले आहे.

‘बेस्टच्या खाजगीकरणावर बोलताना रेल्वेचं खाजगीकरण, इंधन दरवाढ यावर ते शांत बसले. वास्तविक, आज हेच प्रश्न केंद्र सरकारकडे खास ‘राणे स्टाईल’मध्ये मांडून त्यांनी ते सोडवायला पाहिजेत. पण दुर्देवाने आज त्यांना बोलताना ऐकून असं वाटतं की.. ‘काय होते तुम्ही काय झाले तुम्ही?’ असा प्रश्न विचारत पवार यांनी राणेंना त्यांच्याच शब्दात सुनावले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.