पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. पुण्यातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. अजित पवार यांनी ही संचारबंदी जाहीर केली होती. १३ जुलै पासून २३ जुलैपर्यंत पुण्यात संचारबंदी असणार आहे. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवांचा सुरु राहणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, मनपा आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज संचारबंदी विषयी माहिती दिली.
१३ जुलैच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू होणार आहे. केवळ अत्यावश्यक सुविधा सुरु राहणार आहेत. यामध्ये दूध, औषधे यांचा समावेश असणार आहे. अगदीच अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ‘संचारबंदी अडचणीची असली तरी परिस्थिती पाहता ती करणे गरजेचे आहे,’ असे अजित पवार यांनी सांगितले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता, व्यापक सर्वेक्षण आणि कोरोना चाचण्या वाढविण्यासोबत कोरोनाची साखळी तोडणे हे एक मोठे आवाहन असल्याचे अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले आहे.
पुणे शहर तसेच लगतच्या गावात संसर्ग वाढत आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी सक्त उपाययोजना राबविण्यासोबत ‘फिव्हर क्लिनिक’ मध्ये मनुष्यबळ तसेच सामग्री उपलब्ध करून द्यावी. कोविड केअर सेंटर तसेच डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मध्ये राज्य शासनाच्या सूचनेनुसार सर्व आरोग्यविषयक सुविधा सज्ज ठेवाव्यात असेही अजित पवार यांनी सांगितले आहे. ज्या गावात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत त्या गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.