३० दिवसांत वाढले तब्बल ३ लाख कोरोनाग्रस्त; अनलाॅक १.० मध्ये वेगाने वाढले संक्रमण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या तीस दिवसांत कोरोनाचा सुमारे तीन लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. १ जूनपासून सुरू झालेल्या अनलॉक 1.0 मध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढले आहे. मात्र, हे खरे आहे की या काळात लोक जास्तच घराबाहेर पडू लागले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 23 मे रोजी कोविड -१९ ने संक्रमित रुग्णांची संख्या 1,25,1001 होती, जी 24 जूनपर्यंत 4,56,183 वर पोहोचली. म्हणजेच, गेल्या तीस दिवसांत तीन लाखाहून अधिक कोरोना संसर्गाची नोंद झाली आहे.

1 जून ते 20 जून पर्यंतची स्थिती
1 जून रोजी भारतात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण 1,90,535 होते. या दिवसापासून देशातील आर्थिक उपक्रमांसह धार्मिक स्थळे तसेच रेस्टॉरंट्सना उघडण्याचे ठरले. मात्र त्यानंतर 20 दिवसातच कोरोनाचा संसर्ग 3 लाख 95 हजारांवर पोहोचला. या काळात भारतात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली असली तरी या साथीच्या आजाराचा मुंबईत होणारा संसर्ग कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, दिल्ली आणि मुंबईत कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याचे धोरण आता बदलले आहे. एकीकडे कोरोनाच्या नवीन संसर्गाच्या संख्येत घट झाल्याने आर्थिक राजधानी मुंबईतील उपनगरीय भागात आता लक्ष केंद्रित केले गेले आहे. आता जास्तीत जास्त लोकांचे स्क्रीनिंग करण्याची रणनीती आखली गेली आहे. त्याचबरोबर दिल्लीमध्येही बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. या व्यतिरिक्त चाचणीचा वेग वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

विशेष म्हणजे जूनमध्ये मुंबईत कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे परंतु दिल्लीत त्याचे प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेता दिल्लीत अनेक हजार बेड्सची कोविड केंद्रे उभारली जात आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले आहे की, पुढच्या आठवड्यात दिल्लीत 10 हजार खाटांचे रुग्णालयाचे काम करण्यास सुरवात होईल. लवकरच त्याची संख्या वीस हजारांवर नेली जाईल.

भारत पोहोचला चौथ्या क्रमांकावर
जगात कोरोना संक्रमणाची संख्या 93 लाखने ओलांडली आहे. या साथीमुळे आतापर्यन्त 4,80,000 पेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाने संक्रमित होण्याच्या बाबतीत आता भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. रशिया, ब्राझील आणि अमेरिका हे भारताच्या वर आहेत. कोरोनाद्वारे अमेरिका हा जगातील सर्वाधिक प्रभावित देश आहे. तेथे सुमारे 23 लाख संक्रमित लोक आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment