हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अनेक दिवस देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्या, कोरोनामुळे होणारे मृत्यू, कोरोना उपचार, कोरोनासंबंधी राजकीय लोकांचे आरोप-प्रत्यारोप, कोरोना बचावासाठीचे उपाय, दक्षता असे अनेक विषय माध्यमांमधून झळकत आहेत. टीव्ही लावला असता टीव्ही वर सतत कोरोनाचे अपडेट्स दिले जात आहेत. आज मात्र या बातम्यांची जागा ‘निसर्ग’ चक्रीवादळाने घेतली आहे. सकाळपासून टीव्हीवर या चक्रीवादळाची चर्चा सुरु आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मजेशीर ट्विट केले आहे. त्यांनी “जवळपास अडीच महिन्यांनी टीव्ही कोरोना मुक्त झाला” असे म्हंटले आहे.
दिवसभर टीव्हीवर निसर्ग चक्रीवादळाच्या बातम्या दिल्या जात आहेत. हे वादळ आता भूपृष्ठावर येऊन धडकले आहे. आणि ते उत्तर महाराष्ट्राकडे सरकले आहे. या वादळाशी संबंधित बातम्या वृत्तवाहिन्यांवर दाखविल्या जात आहेत. तसेच राज्यात नागरिकांना सतर्क राहण्यासही आवाहन केले जात आहे. त्यामुळे आज कोरोनाच्या बातम्या नागरिकांच्या फारशा कानावर आल्या नाहीत. संजय राऊत यांनी “अडीच महिन्यांनी टीव्ही कोरोनमुक्त झाला आहे आणि त्याला चक्रीवादळाचा फटका बसला आहे.” असे ट्विट केले आहे.
*जवळपास अडीच महिन्यांनी आज TV कोरोना मुक्त झाला असून, आज TV ला चक्री वादळाचा फटका बसला आहे.*
😂🤣— Sanjay Raut (@rautsanjay61) June 3, 2020
दरम्यान हे वादळ काही तासच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मात्र अदयाप धोका टळला नसल्याने सतर्क राहण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे. संजय राऊत याच्या ट्विटवर अनेकांनी विडंबनात्मक प्रतिक्रिया दिल्या असून या चक्रीवादळाच्या माध्यमातून मुंबईला उडवून गुजरातला न्यायचा डाव फसला असल्याची प्रतिक्रिया एकाने दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.