मुंबई । केंद्र सरकारने १ जूनपासून संचारबंदीचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. सोबत काही नियम शिथिल केले आहेत. तसेच राज्यांना त्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने आज या नियमांमध्ये सुधारणा करीत ते जाहीर केले आहेत. सुधारित नियमांमध्ये शारीरिक बाह्य क्रियाकलापांना परवानगी असलेली दुकाने उघडणे, खाजगी कार्यालये पुन्हा सुरू करणे, वर्तमानपत्र विक्री, शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्यांची उपस्थिती, आंतरराज्यीय हालचाली यांना परवानगी देण्यात आली आहे.
जिम, प्ले ग्राउंड, स्विन्ग्स/बार उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. एका दिवशी एका बाजूची दुकाने उघडली जातील तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जातील. याचे नियोजन करण्याचे तसेच नियंत्रण ठेवण्याचे आणि नागरिक सामाजिक अलगाव चे नियम पाळतात की नाही हे पाहण्याचे काम महानगरपालिका तसेच स्थानिक पोलिसांचे असेल. ८ जूनपासून सर्व खाजगी कार्यालये १०% कार्यक्षमतेवर सुरु राहतील, किंवा १० लोकांनाच कार्यालयात हजेरी लावता येईल व इतरांना घरातून काम करावे लागेल असे या सुधारित नियमामध्ये म्हंटले आहे. तसेच सर्व कर्मचारी निर्जंतुकीकरणाची पुरेशी काळजी घेत आहेत का हे पाहणे गरजेचे आहे जेणेकरून घरातील असुरक्षित जसे की वृद्ध लोकांना त्रास होणार नाही हे पाहण्यास सांगण्यात आले आहे.
Ammendments to the Guidelines- Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown.#MissionBeginAgain pic.twitter.com/5zWHvy4xtu
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 4, 2020
७ जूनपासून वर्तमानपत्रांची छपाई आणि वितरणास या नियमांमध्ये परवानगी देण्यात आली आहे. वृत्तपत्र वितरण करणाऱ्या व्यक्तींनी मास्क लावणे, हात निर्जंतुकीकरण करणे तसेच सामाजिक अलगाव पाळणे बंधनकारक आहे. शैक्षणिक संस्था तसेच विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना केवळ ई- कँन्टेन्ट तयार करण्यासाठी, उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी आणि निकाल जाहीर करण्यासाठी काम करता येईल. तथापि व्यक्तींची आंतरराज्यीय आणि आंतर जिल्हा हालचाल नियमित केली जाईल.मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत लोकांच्या जिल्ह्यांतर्गत हालचालीस कोणत्याही निर्बंधाशिवाय परवानगी दिली जाईल. एसओपी जारी केल्यानुसार प्रमाणित कामगार, स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक इत्यादींच्या नियमिततेचे नियमन केले जाईल. असे या सुधारित मार्गदर्शिकेत सांगण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.