अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; पोलिसांच्या सतर्कतेने मुले सुरक्षित

सांगली प्रतिनिधी । सांगलीतील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करुन त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न सांगलीतील विश्रामबाग पोलिस आणि सातारा रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला आहे. या पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने ही मुले सुरक्षित आहेत. रात्री ११ च्या सुमारास मिरजेतून महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून तीन मुलांना घेऊन एकजण मुंबईकडे प्रवास करत होता. यावेळी मुलांना घेऊन जाणाऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी साताऱ्यात मध्यरात्रीच्या … Read more

मोटारसायकली चोरी करणारी टोळी गजाआड; पंढरपूर पोलिसांची कामगिरी

सोलापूर प्रतिनिधी । विविध जिल्ह्यातून मोटारसायकली चोरणाऱ्या एका अंतरराज्य टोळीचा पंढरपूर तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपीकडून सुमारे 4 लाख 33 हजार रुपये किंमतीच्या विविध कंपन्यांच्या 15 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.याप्रकरणी महेश पांडुरंग चव्हाण या संशयीत आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी बंडु उर्फ जयदीप प्रकाश गायकवाड आरोपी फरार आहे. कासेगाव (ता.पंढरपूर) येथून 30 … Read more

कोल्हापूर मोक्का न्यायालयातून आरोपीने ठोकली धूम..

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर मोक्का गुन्ह्याखाली अटकेत असलेला आरोपी श्रीधर अर्जून शिंगटे (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज) हा आज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातून पळून गेला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शिंगटे याच्याविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी कोल्हापूरातील राजारामपूरी, जुना राजवाडा, गडहिंग्लज आणि आजरा पोलिस ठाण्यात त्याच्याविरूद्ध विविध गुन्हे दाखल … Read more

दीदींच्या बंगालमध्ये कैलाश विजयवर्गी यांना CAAच्या समर्थनार्थ रॅली काढल्याबद्दल पोलिसांनी घेतलं ताब्यात

सीएएच्या समर्थनार्थ कोलकाता येथे रॅली काढल्याप्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतलं. विजयवर्गीय यांच्याबरोबरच पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय आणि जय प्रकाश मजूमदार यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून मुलाने केला पित्याचा खून

सांगली प्रतिनिधी । पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीमध्ये बापलेकांचं भांडण झालं. या भांडणात मुलाने बापाच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून, भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत तीन दिवसात दुसरा खून झाल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीमध्ये … Read more

किनी टोलनाक्यावर पोलिसांवर गोळीबार, कोल्हापूरात भितीचे वातावरण

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर कोल्हापूर येथील किनीटोलनाका येथे आज गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. कोल्हापूर पोलीस आणि राजस्थान येथील २५ गुन्ह्यांत आवश्यक असलेले तीन आरोपी यांच्यात फायरींग झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेमुळे किनीटोलनाका आणि परिसरात काहीकाळ भितीचे वातावरण पसरले होते. हाती आलेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील २५ गुन्ह्यांत आवश्यक … Read more

गुटख्याच्या बॅगा चोरल्याच्या संशयातून एकाचा खून, दोघे गंभीर; सहा जणांना अटक

गुटख्याच्या बॅगा चोरल्याच्या संशयातून अमानुष मारहाण केल्याने मृत्यू झालेल्या तरुणाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील सहभागी अन्य चौघा जणांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात अली आहेत. या घटनेत दानोळी (ता. शिरोळ) येथील अर्जुन नामक तरुणाचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे.

वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

गुजरातच्या गांधीनगरमध्ये एक अजब घटना उघडकीस आली आहे. एका शाळेत शिकविणारीच वर्गशिक्षिका आपल्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची तक्रार पालकांनी पोलिसांत दाखल केली आहे.

पतंगाच्या नायलॉन मांज्यामुळे अनेक नागरिक जखमी; विक्रेत्यांवर पोलिसांची थातुरमातुर कारवाई

नुकताच संक्रांत हा सण साजरा झाला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले गेले. मात्र नायलॉन व मांजा वापरण्यास बंधी असतांना पतंगबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या नायलॉन व मांजा दोऱ्यामुळे शहरातील विविध भागांतील नागरीक जखमी झाले आहेत. जिवघेण्या नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही त्याची शहरात बड्या व्यापाऱ्यांनकडून विक्री होत आहे. मात्र पोलिस छोट्या व्यापाऱ्यांना लक्ष करून थातूरमातूर कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

कोल्हापूरात वाहतूक पोलिसांची गांधीगिरी; दंड न आकारता वाहन धारकांना दिलं गुलाबाचं फूल

रस्ते सुरक्षा सप्ताहा निमित्ताने वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांसाठी कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांनी आगळी वेगळी मोहीम हाती घेतली आहे. नेहमी दंड लावूनही अनेक वाहन चालक नियम पाळत नसल्याने वाहतूक पोलिस आता गांधीगरी करताना दिसत आहेत. जे वाहतुकीचे नियम नियमित पाळतात, त्यांना गुलाबाचे पुष्प दिले जात आहेत. तर जे नियम पाळत नाही त्यांनी नियमावलीचे पत्रक देत कायदा पाळण्याचे आवाहन शहरातील विविध सिग्नलवर पोलीस देत आहेत.