सिंधुदुर्ग भाजपला राणे प्रवेश मान्य, अंतिम निर्णय भाजप प्रवेशावर कोअर कमिटी घेणार

सिंधुदुर्ग प्रतिनिधी। नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत आज भाजपाची मुबंईमध्ये कोअर कमिटी बैठक होणार आहे. राणेंच्या भाजपा प्रवेशावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोललं जातं आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत राणेंच्या प्रवेशाबाबत निर्णय होणार असून भाजपा शिवसेना युती होणार की नाही यावर देखील चर्चा होणार आहे. परंतु आत्तापर्यंत राणेंच्या प्रवेशाबाबत काहीच कल्पना नाही असे सांगणाऱ्या सिंधुदुर्ग भाजपला देखील … Read more

‘चव्हाण साहेब झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवा,’ तावडेंचा अशोक चव्हाणांना सल्ला

नांदेड प्रतिनिधी। राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये दिलेला सल्ला चांगलाच चर्चिला जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा गड समजल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला होता. याच गोष्टीची आठवण करून देत तावडेंनी अशोक चव्हाण यांना मित्रत्वाच्या नात्याने सल्ला दिला.आज मंगळवारी मंत्री विनोद तावडे नांदेड दौऱ्यावर आले … Read more

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वंचित सोबत जाणार?

कोल्हापूर प्रतिनिधी। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत माजी मंत्री प्रकाश आवडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन नव्या राजकीय घरोब्याची तयारी सुरू केली आहे. उभय नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास बंद खोलीत खलबते झाली. मात्र, चर्चेविषयी माहिती देण्यात आली नाही. इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले या तीन मतदारसंघात आवाडे गटाची लक्षणीय ताकद आहे. त्या … Read more

…तर विधानसभेचा उमेदवारी अर्जसुध्दा भरणार नाही- अनिल बाबर

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे ‘मी येतोय असे काही जण म्हणत आहेत. परंतु कुणाला यायला आमची बंदी नाही. बंदी तर तुमच्याकडे आहे. आमदारांनी विट्यासाठी काय दिले ? असा प्रश्न विचारता. पण तुम्ही पण दोनवेळा आमदार होता. तुम्ही तर कायद्याचे पदवीधर आहात पालिका अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. विधानसभेच्या प्रोसेडिंगमधून माहिती घ्या. विट्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी माझे योगदान … Read more

प्रणिती शिंदेंकडून आचारसंहिता भंग? नरसय्या आडम यांची तक्रार

कोल्हापूर प्रतिनिधी। राज्यभरात शनिवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झालेली असताना सोलापुरात पहिल्याच दिवशी माजी आमदार नरसय्या आडम यांनी शहर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटप करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी … Read more

अकोले मध्ये भाजपला मोठा धक्का

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आज अजित पवार यांच्या सभेमध्ये आणि उपस्थितीत अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजप जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे, सुनीता भांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान मधुकर पिचड यांच्या विरोधात ‘एकास एक लढत’ देण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली असून लहामटे आणि … Read more

एमआयएमची दुसरी यादी जाहीर, सोलापूरमधून तीन उमेदवारांची नावे

सोलापूर प्रतिनिधी। वंचित बहुजन आघाडी कडून एमआयएम पक्षाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही तसेच विधानसभेसाठी आठच जागांची ऑफर दिल्याचे सांगत एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी युती तुटल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तातडीने त्याने ११ सप्टेंबर ला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर मधील काळात पुन्हा युती होणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली … Read more

 माजी आ.परिचारक निवडणूक लढणार ?

सोलापूर प्रतिनिधी। माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिलेआहेत. माजी आमदार सुधाकर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक आज सायंकाळी येथील टिळक स्मारक सभागृहत पार पडली. यावेळी शहरातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी  सुधाकर परिचारक यांनी निवडणूक लढवावी. असा सर्वानुमते ठराव नगराध्यक्षा साधना भोसले यांना दिला. सुधाकर परिचारक यांनी पंढरपूरचे सलग 20 … Read more

‘भाकप’ तर्फे कोल्हापूर उत्तरसाठी उमेदवार जाहीर

कोल्हापूर प्रतिनिधी। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सतीशचंद्र कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार आज जाहीर करण्यात आला आहे. युती सरकारने शेतकरी, विद्यार्थी, अल्पसंख्यांक, दलित महिला आणि असंघटित कामगार यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलं आहे. ‘विरोधी पक्ष कमकुवत ठरल्याने सक्षम पर्याय म्हणून भारतीय … Read more

कर्नाटक सीमा भागात १४ ठिकाणी नाकाबंदी, पोलीस दल निवडणुकांसाठी सज्ज

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील भांगात विशेष दक्षता घेणारी पाऊल उचलण्यात अली आहेत. त्यानुसार ‘ सीमावर्ती भांगातून रक्कम घेऊन जात असताना 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यासोबत पुरावा म्हणून आवश्यक ती कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अन्यथा अशी संशयीत रक्कम आयकर विभागाकडे वर्ग … Read more