राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी २० हजार कोटी द्या; अशोक चव्हाणांची नितिन गडकरिंना मागणी

नांदेड | राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी येत आहेत, काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी व त्यासोबतच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने होण्यासाठी २० हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने राज्यातील राष्ट्रीय महामार्गास द्यावा अशी … Read more

.. तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू- अशोक चव्हाण

सोनिया गांधी यांचा तीन पक्षांच्या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. मात्र, सरकार स्थापन करत असताना आम्ही घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

नांदेडमध्ये तीन दिवसीय होट्टल महोत्सवाला सुरुवात

नांदेड प्रतिनिधी । नांदेडमध्ये तीन दिवसीय होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाला सुरवात झाली आहे. या म्होतसवाचे १७ ते १९ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाद्वारे जिल्हावासियांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले़. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी ४.३० … Read more

धक्कादायक! माहेरून पैसे न आणल्याने सासरच्यांनी सुनेसह २ मुलांचा खून करून विहिरीत टाकले

माहेरून घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये न आणल्यामुळे एका विवाहितेला तिच्या दोन मुलांना ठार मारून तीने आत्महत्या केल्याचे भासविणाऱ्या सासरच्या मंडळीवर कंधार पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गोणार येथे रविवारी १ डिसेंबर सायंकाळी घडली. घटना घडल्यासून सासरची मंडळी फरार असून त्यांना जोपर्यंत अटक करणार नाहीत. तोपर्यंत तिन्हीही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातेवाईकांना दिला आहे. सध्या विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात तणावाचे वातावरण आहे. विहिरीत टाकणाऱ्या पतीसह पाच जनावर कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडमध्ये मतदानाला पावसाचा फटका, मतदान केंद्रावर गर्दीच नाही

नांदेडमध्ये आज सकाळपासून पाऊस पडतो आहे. रिमझिम पावसात मतदान प्रक्रिया सुरु आहे. मात्र मतदान केंद्रावर मतदारांची म्हणावी अशी गर्दी दिसत नाही. सकाळच्या पहिल्या सत्रात पावसामुळ मतदारांचा अल्प प्रतिसाद आहे. त्यामुळं पावसाचा मतदानावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. एखाद दोन मतदार येऊन मतदान करताना दिसतायेत. जिल्हातील एकूण ९ मतदार संघात २९५५ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. इथं एकूण ३२७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या भवितव्याचा फैसला आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

‘चव्हाण साहेब झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवा,’ तावडेंचा अशोक चव्हाणांना सल्ला

नांदेड प्रतिनिधी। राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये दिलेला सल्ला चांगलाच चर्चिला जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा गड समजल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला होता. याच गोष्टीची आठवण करून देत तावडेंनी अशोक चव्हाण यांना मित्रत्वाच्या नात्याने सल्ला दिला.आज मंगळवारी मंत्री विनोद तावडे नांदेड दौऱ्यावर आले … Read more

महाराष्ट्रातील ‘हे’ गावे तेलंगणात सामाविष्ट करण्याची मागणी

नांदेड प्रतिनिधी | तेलंगणा राष्ट्र समिती सरकारच्यावतीने तेलंगणा राज्यात राबवण्यात येणा-या कल्याणकारी योजनेला प्रभावित होत तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील गावांमधील सरपंचानी ग्रामस्थांसह मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान तेलंगणा राज्याप्रमाणे कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सीमेलगत असलेल्या गावांमध्ये करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. त्याचबरोबर ही योजना लागू न केल्यास नांदेड जिल्ह्यातील … Read more

या चोरांचं सरकार परत येऊ देऊ नका – प्रकाश आंबेडकर

Untitled design T.

नांदेड प्रतिनिधी /  नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे वंचित बहुजन आघाडीची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, आमचं सरकार आलं तर आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ. नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीची पहिलीच सभा काल घेण्यात आली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. नोटा बंदीचा … Read more

नांदेडमधून अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढणार…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | नांदेडमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नांदेडमधून अशोक चव्हाणांऐवजी त्यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा होती. मात्र हायकमांडच्या आदेशानंतर अशोक चव्हाण आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षणांनी निवडणूक लढविली नाही तर चुकीचा संदेश जाण्याची भीती हायकमांडला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण … Read more