‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावर बंदी घाला, मावळा संघटनेने केली मागणी

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करून भाजपा नेता व पुस्तक लेखक भगवान गोयल यांनी शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून, महाराजांची तुलना जगातील कोणत्याही व्यक्तीशी होऊच शकत नाही ! असे म्हणत सदरील लेखकावर तात्काळ कारवाई करत पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी मावळा संघटनेच्या वतीने आज … Read more

‘त्या’ वादग्रस्त पुस्तकातील पहिल्या प्रकरणात शिवरायांशी मोदींची शारिरीक तुलना

दिल्ली | आज के शिवाजी नरेंन्द्र मोदी या पुस्तकावरुन चांगलाच वादंग उठला असताना आता सदर पुस्तकातील पहिल्याच प्रकरणात शिवरांयांशी मोदींची शारिरीक तुलना केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची नरेंन्द्र मोदी यांच्याशी तुलना कशी होऊ शकते असा सवाल करत अनेकांनी या पुस्तकावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर भाजपने सदर पुस्तक मागे घेतल्याचे स्पष्टीकरण … Read more

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ पुस्तकावर उदयनराजे सडेतोड भुमिका घेणार?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजप नेते जयभगवान गोयल यांनी रविवारी नरेंन्द्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करणारे पुस्तक प्रकाशित केले. यानंतर देशभरात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले. अनेकांनी भाजपच्या सदर कृत्याचा निषेध केला आहे. आता शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी याबाबत आपण सडेतोड भुमिका घेणार असल्याचे जाहिर केले आहे. ‘आज के … Read more

स्वघोषित तुलनाकार जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेला शिवसेनेने मारले जोडे

जय भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? – संजय राऊत

मुंबई | भाजप नेते जय भगवान गोयल यांनी आज नरेंन्द्र मोदी यांच्या जीवणावरील एक पुस्तक भाजप कार्यालयात प्रकाशित केले. मात्र यामध्ये नरेंन्द्र मोदी यांची तुलना शिवजी महाराजांसोबत केल्याने वाद उफाळून आला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आज के शिवाजी – नरेंन्द्र मोदी असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे विविध स्तरांतून सदर पुस्तकाचा निषेध नोंदवला जात आहे. शिवसेना … Read more

शिर्डी-बितनगडावर सापडली शिवकालीन तोफ

अहमदनगर प्रतिनिधी | अकोले तालुक्यातील बिताका गावाजवळच्या बितनगडावर पूरातन काळातील शिवकालीन तोफ सापडली आहे. पाण्याच्या टाकीतील गाळ काढण्याचे काम सुरु असताना तरुणांना ही तोफ सापडल्याचे समजत आहे. पाण्याच्या टाक्यामधील गाळ काढण्याचे खोदाई काम सुरु असताना पुरातन तोफेच्या आकाराची लोखंंडी वस्तु तरुणांना आढळून आली. सदर बाब तरुणांनी ग्रामस्थांना सांगितल्यानंतर पुरात्व विभागाला यांची माहिती देण्यात आली. स्थानिकांनी … Read more

चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

 सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

लोकसभा पोटनिवडणूकीवेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर सांगता सभेत यांनी मुस्लिम समुदायाला भडकवणारी आणि त्यांची निंदानालस्ती करणारी भाषा वापरल्यामुळे याचा फटका उदयनराजेंना निवडणुकीत बसला. वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाज कमालीचा दुखावला गेला होता.

निवडणूक निकालानंतर ही बातमी उदयनराजेंना समजल्यानंतर मुस्लिम समुदायाची माफी मागण्यासाठी आज पहिल्यांदाच कराडमध्ये गेले होते. विक्रम पावसकर यांना चांगलाच धडा शिकवा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. मी त्या ठिकाणी असतो तर पावसकरांना सभेतून खाली खेचलं असतं असं उदयनराजे म्हणाले. याशिवाय माझ्या प्रचारात त्यांना मी कोणताच रोल दिला नव्हता मात्र सांगता सभेत त्यांनी वादग्रस्त भाषण करून संपूर्ण कामावर विरजण घातलं असंही उदयनराजे पुढे म्हणाले.

श्रीनिवास पाटील यांचा नावलौकिक वाढेल असं काम सातरकरांनी करावं असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. मी जर गुंड, मवाली असतो तर लोकांनी मला मुलासारखं सांभाळलं नसतं. माझ्याकडून झालेल्या चुकांची मी माफी मागतो असं म्हणत अधिक चांगलं काम करण्यासाठी मला ताकद द्या असं भावनिक आवाहनही उदयनराजे यांनी यावेळी केलं.

पहा विडिओ- 

चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

शेतकर्‍यांचे उभे पीक केले उद्धवस्त, शिवबाच्या राज्यात वनाधिकाऱ्यांचे तुघलकी वागणे

अहमदनगर प्रतिनिधी | मुघलांनाही लाजवेल असे काम कर्जत तालुक्यात वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी केले आहे. केवळ वन जमिनीवर भात लागवड केली म्हणून आदिवासींचे उभे पीक या अधिकाऱ्यांनी संगनमताने उध्वस्त केले आहे. माझ्या राज्यातील रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये अशी शिवनीती होती. सध्याचे राज्यकर्ते उठताबसता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात आणि काम मात्र त्याच्या … Read more

EVM वर विश्वास नाही असं म्हणणार्‍या उदयनराजेंचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उदयनराजे भोसले यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री.@AmitShah, पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष @JPNadda, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, केंद्रीय मंत्री @RamdasAthawale, … Read more

सिंहगड घाटात कोसळली दरड, घाट रस्ता राहणार सहा दिवस बंद

thumbnail 1531557957716

पुणे | सिंहगडावर दरड कोसळल्यामुळे सिंहगड किल्ल्यावर जाणारा घाट रस्ता बंद झाला आहे. आज सकाळी सततच्या पावसामुळे घाट रस्तात दरड कोसळली आहे. त्यामुळे सिंहगडावर जाणारी सर्व वाहतूक बंद झाली आहे. सतर्कतेचा मार्ग म्हणून सहा दिवस वाहतूक बंद ठेवून भविष्यात कोसळू शकेल आशा भागांची पहाणी करण्यात येणार आहे. सहा दिवसानंतर रस्ता वाहतुकी साठी खुला करण्यात येणार … Read more