दोन दुचाकींची घाटात समोरासमोर धडक; दोघे गंभीर तर गाड्यांचा चक्काचूर

सांगली | तासगाव तालुक्यातील डोर्ली येथील भिवाघाट मार्गावर दुचाकी गाड्यांची समोरासमोर धडकून दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यामध्ये बस्तवडे येथील तरुण प्रणव हरिराम पाटील जखमी झाला आहे. तर दूसरा द्राक्ष कामासाठी आलेला परराज्यातील तरुण हा जखमी झाला आहे. परराज्यातील तरुण हा डोर्लीकडून तासगावंकडे जात होता तर प्रणव हा तरुण आरवडेकडून बस्तवडेकडे जात होता. जुनी … Read more

वऱ्हाडावर काळाचा घाला ! दोन ट्रकमध्ये भीषण अपघात; 4 ठार तर 22 जखमी

औरंगाबाद – वैजापूर तालुक्यातील लासुर रोडवर मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला. यात 4 चार तर 22 जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील शिवराई फाट्यावर भीषण अपघात झाला. दोन आयशर ट्रकमध्ये हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे गतीवर अचानक नियंत्रण मिळवणे अशक्य झाले आणि चालकांचे वाहनावरील … Read more

कार- ट्रॅक्टरच्या अपघातात भाजप नेत्याचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गडचिरोली जिल्ह्यात कार आणि ट्रॅक्टर मध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये भाजपाचे जिल्हा सचिव तथा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की यात ट्रॅक्टरचे 2 तुकडे झाले. अतुल गण्यारपवार व आनंद गण्यारपवार हे चामोर्शी … Read more

कार अपघातात भाजप आमदाराच्या मुलासह 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वर्धा येथे एका कारचा भीषण अपघात झाला आहे. पहाटे दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये भाजप आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे. देवळी येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ कारला अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून … Read more

हृदयद्रावक! दुकानावर जाताना भरधाव ट्रकने तिघा भावंडांना चिरडले

परभणी – स्वतःच्या दुकानावर जात असताना अचानक भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलवरील तिघा भावांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास तालुक्यातील अकोली पुलावर घडली. अभिषेक काशीनाथ म्हेत्रे (18), योगेश काशिनाथ म्हेत्रे (15), रामप्रसाद विश्वनाथ मेहेत्रे (20) अशी मृतांची नावे आहेत. मृतातील दोघे सख्खे तर एक चुलत भाऊ होता. जिंतूरपासून चार किलोमीटर अंतरावरील अकोली गावाच्या … Read more

परमिट घेऊन विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; संतप्त जमावाकडून रस्तारोको

परभणी प्रतिनिधी | परमिट घेऊन विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या युवकाला अचानक आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने खांबावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात असणाऱ्या एकता नगर मध्ये घडली. याप्रकरणी सदरील युवकाच्या कुटुंबीयांना महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी यामागणीसाठी रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मृत युवकाचा मृतदेह राष्ट्रीय … Read more

वन प्लस मोबाईलचा खिशात स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे आटपाडी येथील प्रकाशवाडी परिसरात राहत असलेल्या प्राण रमेश चव्हाण या युवकाच्या मोबाईलचा खिशात अचानक स्फोट झाला असून त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यानंतर या घटनेबाबत सदर मोबाईल कंपनी विरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली आहे. या घटनेमुळे आटपाडीत हळहळ व्यक्त होत असून युवा पिढीने मोबाईल … Read more

दोन दुचाकींच्या धडकेत पादचारी नर्सचा गर्भपात

Accident

औरंगाबाद – चिखलठाण्याजवळ गुरुवारी रात्री झालेल्या एका विचित्र अपघातात एका पादचारी परिचारिकेचा गर्भपात झाला. ही परिचारिका खाजगी रुग्णालयात काम करते. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, दोन दुचाकी परिचारिकांना धडक दिल्याने या परिचारिकेचा गर्भपात झाला. हा अपघात 13 जानेवारीला रात्री नऊ वाजेच्या सुमारास जालना रोडवरील विमानतळाजवळ झाला. मुकुंदवाडी येथील एंडोवर्ल्ड हॉस्पिटल मधील दोन परिचारिका काम … Read more

बाभळीच्या झाडाला भरधाव कार धडकली; दोन ठार

बीड – परळीकडुन भरधाव वेगात येणाऱ्या कारची बाभळीच्या झाडाला जोरात धडक बसुन आज दुपारी झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यात गाडीचा पूर्ण चक्काचुर होऊन, मृत व जखमींना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरूण रविवारी कारने (एमएच 13 सीके 0441) भोकर येथून तेलगावमार्गे … Read more

औरंगाबाद – नगर महामार्गावर भरधाव कार हाॅटेलमध्ये घुसली

Accident

औरंगाबाद – औरंगाबादकडुन नगरकडे जाणारी भरधाव कार अचानक हाॅटेलमध्ये घुसली. त्यात दोन जण गंभीर, तर एकाच्या पायाला दुखापत झाली आहे. यात दोन दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना औरंगाबाद- नगर महामार्गावरील जिकठाण फाट्यानजीक (ता.गंगापूर) येथे आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. या विषयी अधिक माहिती अशी की, मुख्य महामार्गावरील इसारवाडी फाटा ते शिवराई दरम्यानच्या अंतरावर … Read more