राज्याला परिवहनमंत्री हवा, अनिल परब हे तर परिवारमंत्री ; राणेंचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीदरम्यान झालेला भ्रष्टाचार, राज्यातील कायदा सुव्यवस्था, टक्केवारीचे गणित यापासून ते सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत विविध विषयांवरून नितेश राणे यांनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वर निशाणा … Read more

आम्ही सुपारी घेणारे,मग तुम्ही काय हप्ता घेणारे आहात का?? ; मनसे -शिवसेनेत रंगला कलगीतुरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे मध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. याच दरम्यान मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करु शकत नाही, त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्ययांना घ्यावी लागेल, अशी टीका  शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी केली होती. अनिल परब यांच्या या टीकेवर मनसेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही सुपारी … Read more

एका मराठी महिलेचं कुंकु ज्याने पुसलं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे- अनिल परब

मुंबई । ”एका मराठी महिलेचं कुंकु ज्याने पुसलं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे,” असा गंभीर आरोप परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अर्णव गोस्वामीच्या अटकेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. विशेषकरून भाजप या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर … Read more

विधान परिषदेसाठी उर्मिला मातोंडकरच्या नावावर शिवसेनेचा मोठा खुलासा, म्हणाले..

मुंबई । राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून काही दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा होती. यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याचे सांगितले जात आहे. अशातच उर्मिला मातोंडकरच्या नावावर शिवसेनेनं सूचक विधान केले आहे. उर्मिलाचे नाव आमच्याकडे चर्चेत नाही, प्रस्ताव पाठवू, त्यानंतर काय होतंय ते पाहू, असं … Read more

सर्वसामान्यांना दिलासा !! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीकडून दिवाळीची हंगामी दरवाढ रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एसटीकडून केली जाणारी हंगामी दरवाढ यंदा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात एसटीकडून दरवाढ केली जाते. मात्र, यावर्षी ही दरवाढ रद्द करत दिवाळीच्या सुट्टीला गावाकडे जाणाऱ्यांसाठी एसटीने … Read more

दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकित वेतन मिळण्यासाठी परिवहनमंत्र्यांशी चर्चा करणार; शरद पवारांचं आश्वासन

मुंबई । ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगारांची गैरसोय होऊ नये, दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावं यादृष्टीने परिवहनमंत्र्यांशी तातडीने चर्चा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी संघटनेच्या प्रतिनिधींना दिलं. एसटी कामगारांच्या थकित वेतनाच्या प्रश्नावर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; येत्या गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार होणार

मुंबई । एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार होणार आहे. या पगाराबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. दरम्यान, उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय होईल, असे ट्विट अनिल परब यांनी केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत … Read more

येथील गुंतवणूक आणि बॉलीवूड दुसरीकडे नेण्यासाठी मुंबईला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे का?- शिवसेना

मुंबई । सुशांतसिंह प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या घराण्यांवर आरोप केल्यानंतर कंगना राणावत हीने मुंबई शहराबाबत आक्षेपार्ह्य विधान केलं. मुंबई पोलिसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?,’ असे ट्वीट कंगनानं केले होते. त्यावरून तिच्यावर चहू बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईची … Read more

असुरक्षित वाटतं असेल तर अमृता फडणवीसांकडे मुंबई सोडण्याचा पर्याय; शिवसेना मंत्र्याचे रोखठोक उत्तर

मुंबई । शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. अमृता फडणवीस यांच्या मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी लोकांसाठी राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नसल्याच्या मुद्द्यावरही अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “गेली पाच वर्ष फडणवीस सरकार होतं. पोलीसदेखील तेच होते. सरकार बदललं म्हणजे पोलीस बदलत नाहीत. … Read more

‘ती’ बातमी चुकीची! कोणत्याही एसटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केलं नाही- परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई । कोरोना आणि लॉकडाउनमुळे आर्थिक भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं मागील वर्षी भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र, हे वृत्त चुकीचं असून कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात आलेले नाही अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात … Read more