सिगरेट चोरण्यासाठी पानटपरीवर डल्ला मारणारा चोर कोरोना पॉजिटीव्ह, पोलिसांसह २४ जण क्वारंटाईन

मुंबई । लॉकडाउनमुळे व्यसनी लोकांची चांगलीच फजिती झाली आहे. अशात अनेक ठिकाणी दारूच्या दुकानांमध्ये चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र मुंबईत घडलेल्या अशा एका चोरीमुळे पोलिसांसह, कोर्टाच्या २४ जणांना क्वारंटाईन करावे लागले आहे. सिगरेट करण्यासाठी पाणटपरीवर डल्ला मारणारा चोर कोरोना पॉजिटीव्ह निघाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, सदर २४ वर्षीय तरुण गोरेगाव … Read more

वीज वितरण कंपनीच्या वायरमनसह , सहाय्यक लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

यातील तक्रारदार हे नंदूरबार येथील राहणारे असून त्यांना आरोपी लोकसेवक यांनी त्यांच्या घराचे इलेक्ट्रिक मिटर खराब असून मागील 10 महिन्याचे 1 लाख 25 हजार इतके बिल भरावे लागेल आहे . असे सांगून बिल कमी करण्यासाठी आरोपी लोकसेवक 1 व 2 यांनी तक्रारदारकडे दिनांक 30/11/2019 रोजी 20, 000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 18,000 ₹ लाचेची मागणी करून सदर लाच आज दि .4/12/19 रोजी आरोपी लोकसेवक क्रमांक 1 वायरमन धनंजय कानडे यांनी पंचासमक्ष मंगळ बाजारात तक्रारदाराच्या दुकानाजवळ

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी

हैद्राबाद मध्ये घडलेल्या अत्याचाराने तर संपूर्ण देशच हादरला आहे. अशीच एक अत्याचाराची घटना पुण्यात घडली होती. या घटनेतील आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षे मजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

…त्या आईनेच केला होता चिमुरडीचा खुन; मयत आईवर गुन्हा दाखल

नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे माय-लेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, या घटनेच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मद्यधुंद जमावाकडून पोलिसांवर हल्ला

जीवबा नाना पार्क व राजारामपुरी परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमावाने पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्यात करवीर पोलिस ठाण्यातील हवालदारासह दोन पोलिस जखमी झाले आहेत. तर राजारामपुरीतील मध्यवर्ती चौकात शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस कॉन्स्टेबलला शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करत 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी : आलिशान कार चोरणारा आरोपी गजाआड

सर्व्हिसिंगसाठी आलेली आलिशान कार बावधन येथून चोरण्यात आली होती . या गुन्ह्यातील आरोपीस नुकतीच गोव्यातून अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कामगिरी केली. वसिम कासिम सय्यद (वय ३२, रा. गुगल हौसिंग सोसायटी, मडगाव, गोवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विकास परदेशी यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुंड बंड्या दडगेला अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे स्थानिक गुन्हे विभागाने पोलिसाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार बंडोपंत उर्फ बंड्या अप्पासाहेब दडगे याला तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. गुंड बंड्या दडगे याला ६ महिन्यासाठी सांगली व कोल्हापूर या २ जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. काल मध्यरात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक सांगली शहरातून … Read more

चोवीस तासांच्या आत खुन्यांना अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतील १०० फुटी रोडवरील पाकिजा मशिदीमागे झालेल्या भाउजीच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने खुनातील मुख्य संशयित आरोपी अलीम पठाण व शाहरुख पठाण यांच्या कर्नाटकातील विजापूर येथून मुसक्या आवळल्या. अवघ्या २४ तासाच्या आत आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाला यश आलेलं आहे. बुधवारी मध्यरात्री जमीर रफिक पठाण यांचा त्यांचे मेहुणे … Read more

लोकसभेच्या निकालावर पैज लावणे पडले महागात ; दोघांना ही झाली अटक

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये कोण विजयी होणार यावर एक लाख रुपयांची पैज लावणं मिरजेतील दोघांना चांगलंच महागात पडलं. पैज लावणाऱ्या दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विजयनगर येथील राजू कोरे आणि शिपुर येथील रणजित देसाई यांना अटक करण्यात आली आहे.  सांगली लोकसभा मतदार संघासाठी दि. २३ रोजी … Read more