‘ड्राय डे’ ला दारुचा महापूर; अकरा जणांवर कारवाई

औरंगाबाद – शिवजयंतीनिमित्त ड्राय डे असताना देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या अकरा जणांवर विविध भागांत कारवाई करण्यात आली. या अवैध दारू विक्रेत्यांकडून 22 हजार 410 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. ड्राय डे असताना दारूची अवैध विक्री करणाऱ्या अकरा जणांना छापा मारून पोलिसांनी पकडले. मिटमिटा भागातील एलपीजी गॅस … Read more

शिवाजी महाराजांच्या सर्वाधिक उंच पुतळ्याचा डोळ्याचे पारणे फेडणारा अनावरण सोहळा

Shivaji Maharaj

औरंगाबाद – फटाक्यांची प्रचंड आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, लाईट शोचा लखलखाट आणि हातात भगवे ध्वज घेऊन लाखोंच्या संख्येने उपस्थितीत नागरिकांच्या साक्षीने क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५२ फूट उंचीच्या पुतळ्याचे शुक्रवारी रात्री अनावरण करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषणाने यावेळी आसमंत दुमदुमला. शिवरायांचे शिवतेच पाहण्यासाठी क्रांती चौकात जमलेल्या विक्रमी अलोट गर्दीच्या डोळ्याचे पारणे फिटले. … Read more

शिवजागर महोत्सवात शिवरायांचा अभिषेक सोहळा; परिसरात भक्तिमय वातावरण

औरंगाबाद – शिवजयंतीनिमित्त क्रांतीचौक येथे शिवसेना आयोजित “शिवजागर महोत्सव” सुरू असून या निमित्ताने 3 दिवसापासून दररोज छत्रपती शिवरायांना अभिषेक सुरू आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. त्यावेळी 21 नद्यांचे पाणी व दुधाने अभिषेक करून 16 सुवासिनींनी औक्षण केले होते. त्याच धर्तीवर तीन दिवसापासून “शिवजागर” महोत्सवात परिसरातील 21 नद्यांचे पाणी, दुधाने व … Read more

मनपा भरणार 46 लाखांचा हफ्ता

औरंगाबाद – सातारा-देवळाई परिसराचा सहा वर्षांपूर्वी मनपात समावेश झाला. या भागात ड्रेनेज ची कोणतीही यंत्रणा नाही. 232 कोटी रुपये खर्च करून ड्रेनेज लाईन टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी आवश्यक आहे त्यासाठी 2 कोटी 32 लाख रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्यावे लागणार आहेत. त्यातील पहिला टप्पा म्हणून 46 लाख रुपये सोमवारी महापालिकेकडून देण्यात … Read more

‘स्मार्ट सिटी’तील 37 हजार ग्राहक अंधारात

औरंगाबाद – चिकलठाणा येथील महापारेषणच्या 132 के.व्ही. उपकेंद्रात काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास बिघाड झाला आणि महावितरणची माडा कॉलनी तसेच एन-4 ही 33 के.व्ही.ची दोन्ही उपकेंद्रे बंद पडली. परिणामी चिकलठाणा, मुकुंदवाडी, एन-4, गारखेडा, आकाशवाणी, पुंडलिक नगर इत्यादी भागातील तब्बल 37 हजार वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित झाला. दुपारी बंद पडलेल्या पुरवठा सायंकाळपर्यंत सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे … Read more

औरंगाबादला काहीतरी खास मिळणार ! केंद्रीय मंत्री कराडांच्या ‘या’ ट्विटने चर्चांना उधाण

Dr. bhagavat karad

औरंगाबाद – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज केलेले एक ट्विट शहरात प्रचंड व्हायरल झाले आहे. ‘लवकरच ऐतिहासिक शहरासाठी ऐतिहासिक निर्णयाची घोषणा’ असे ट्विट मंत्री डॉ. कराड यांनी केले आहे. यात त्यांनी ऐतिहासिक देवगिरी किल्ला दाखवला आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले … Read more

मनपाचे लसीकरण टार्गेट पूर्ण; आता ‘इतके’ शहरवासी झाले लसवंत

औरंगाबाद – जिल्हा प्रशासनाने कडक नियमावली केल्याने काही दिवसातच औरंगाबाद महापालिकेने दिलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे टार्गेट पूर्ण केले आहे. राज्य सरकारने शहराला लसीकरणासाठी 10 लाख 32 हजार 174 एवढे टार्गेट दिले होते. मात्र , पालिकेने याही पुढे जाऊन 11 लाख 57 हजार 726 नागरिकांचे लसीकरण केले आहे. त्यामुळे आजघडीला शहरात 112.16 टक्के लसीकरण झाले आहे. … Read more

चार पानी सुसाईड नोट लिहून तलाठ्याने केली आत्महत्या

Suicide

औरंगाबाद – तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात कार्यरत एका तलाठ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. लक्ष्मण नामदेव बोराटे (४०, रा. कोळेकर गल्ली, सातारा परिसर) असे गळफास घेतलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या घटनेने सध्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद … Read more

सिल केलेले ‘ते’ 35 दारूचे दुकाने झाली सुरु

liquor shop

औरंगाबाद | ‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत संचारबंदी लावण्यात आली होती. तेव्हा फक्त होम डिलिवरीला परवानगी असताना सुद्धा काउंटर सेल करत मद्य विक्री करणारे 35 दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केली होती. 7 जूनला संपूर्ण शहर अनलॉक झाले. त्याचबरोबर विक्रीला सुद्धा परवानगी मिळाली. परंतु सिल केलेल्या दुकानांना परवानगी मिळाली नव्हती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या … Read more

अमरप्रीत चौकात उड्डाणपूलाची गरज – खा. जलील

imtiaz jalil

औरंगाबाद | चिकलठाणा विमानतळ ऐवजी शहरातील अमरप्रीत चौकात उड्डाणपूल बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश द्यावे यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे. अमरप्रीत चौक आणि आकाशवाणी या ठिकाणी वाहतूकीची प्रचंड कोंडी होते. त्यामुळे या दोन ठिकाणी उड्डानपुल करा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन … Read more