वानखेडेच्या पिचवर आता कोरोनाचा सामना; स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारणार

मुंबई । राज्यावर कोरोनाचे संकट कायम आहे. जून महिन्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचा संकटाचा सामना करण्यासाठी लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारणार येणार आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिकेने तयारी सुरु केली … Read more

बदली होताच प्रविण परदेशींचा रजेसाठी अर्ज

मुंबई । मुंबई महापालिका आयुक्तपदावरून शासनाने पायउतार केल्यानंतर प्रविण परदेशी यांनी रजेसाठी सरकारकडे अर्ज केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ई-मेलद्वारे परदेशी यांनी सरकारकडे रजेसाठी अर्ज केला आहे. परदेशी यांची बदली नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदी झाली होती.  प्रविण परदेशींनी नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर रजेचा अर्ज केला. दरम्यान, परदेशी … Read more

अश्विनी भिडेंची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई ।  मुंबईत करोनाने थैमान घातले असताना प्रशासनात कोणताही गोंधळ असू नये म्हणून राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या जागी नगरविकास विभागाचे विद्यमान प्रधान सचिव इक्बाल चहल यांची बदली झाली असताना आणखी एक नियुक्ती पालिका प्रशासन स्तरावर राज्यशासनाने केली आहे. मेट्रो ३ च्या माजी व्यवस्थापकिय संचालक अश्विनी भिडे यांना … Read more

प्रवीण परदेशी यांची मुंबई पालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी; इक्बाल चहल सूत्र घेणार हाती

मुंबई । मुंबईत कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच राज्य सरकारने मुंबई पालिकेचं व्यवस्थापन सांभाळत असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. मुंबईत कोरोनाने थैमान घातले असताना प्रशासनात कोणताही गोधळ असू नये म्हणून राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. यात पहिला दणका मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना देण्यात आला आहे. परदेशी यांच्या जागी मुंबई … Read more

मुंबईत कोरोनाचा हैदोस; कोरोनाग्रस्तांची संख्या साडे ३ हजाराच्या घरात जाईल

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाने आता रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत आणखी वाढ करत आहे. सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे राज्यात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळत आहेत. सध्या मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८५७ वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी येत्या ४ दिवसात मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा … Read more

मुंबईत विना मास्क बाहेर पडल्यास, आता गुन्हा दाखल होणार

मुंबई । करोनाचा शहरातील वाढता संसर्ग पाहता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेने मुबंईत मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. आता विना मास्क घराबाहेर पडल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी हे आदेश दिले आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे कोणत्याही … Read more

मुंबई महापालिकेनं केले तबलिगी जमातच्या १५० जणांवर गुन्हे दाखल

मुंबई । दिल्लीच्या निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्यांनाइशारा देऊनही स्वत:हून पालिकेसमोर न येणाऱ्या तबलिगी जमातच्या १५० जणांविरोधात मुंबई महापालिकेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तर मुंबईत आढळलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे तबलिगींच्या संपर्कातील असून इतर रुग्ण हे केवळ १० टक्केच असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबईतील … Read more

शाहरुख खानने क्वारंटाइन सेंटर बनवण्यासाठी दिली स्वत:ची इमारत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) त्याच्या चार मजली खासगी कार्यालयाची जागा देण्याची ऑफर दिली, जेणेकरून या जागेचा उपयोग महिला, मुले आणि वृद्धांना क्वारंटाइन ठेवण्यासाठी होईल.सध्या, संपूर्ण जग कोरोनाव्हायरस साथीच्या विरूद्ध लढा जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा परिस्थितीत शाहरुखने पुन्हा मदतीचा हात देऊन लोकांची मने … Read more

करोनानं रस्त्यावर थुंकणं केलं महाग; भरावा लागणार १००० रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) कठोर पावले उचलली आहेत. मुंबईतील रस्त्यावर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आता १००० रुपये दंड आकारला … Read more

करोना साईडइफेक्ट: केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलावा, नाहीतर..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता पूर्वकाळजी म्हणून खासगी कंपन्यांना एकूण कर्मचाऱ्यांच्या फक्त ५० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्याचे तसंच इतरांना घरुन काम करण्याची मुभा देण्याचे आदेश मुंबई मनपाने दिले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी याबाबत आदेश देत सदर आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल असा … Read more