‘मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा नाही’ – चंद्रकांत पाटील

‘निवडणुकीपूर्वी पक्षाने राज्यातील सर्व जागांचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणानुसार कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असे मला सांगण्यात आले. निवडणूक लढवीत असलो तरी मुख्यमंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा मला नाही,’ असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले.

आघाडीच्या फक्त ४० जागा निवडून येतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी वर टीकास्त्र सोडले आहे. ‘येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेस , राष्ट्रवादी आघाडीच्या फक्त ४० जागा असतील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ही त्यांना मिळणार नाही’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

कोथरूडची लढाई ही नेता विरुद्ध कार्यकर्ता अशीच; इथल्या निवडणुकीत काश्मीर कशाला पाहिजे? – किशोर शिंदे

कोथरुडची निवडणूक ही स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशीच असणार आहे. भाजपचा उमेदवार आजही कोथरूडमध्ये घर घेण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत ज्या माणसाला कोथरुड नक्की काय आहे हेच माहीत नसेल तो इथल्या लोकांमध्ये कसा मिसळणार असा सवाल करत – यंदा कोथरूडमध्ये १०० टक्के परिवर्तन होणार असा विश्वास मनसेचे कोथरुड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किशोर शिंदे यांनी व्यक्त केला. हॅलो महाराष्ट्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संचलन

कोल्हापूर प्रतिनिधी। राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने आज शाहूपुरी येथे विजयादशमीचे संचलन केले. पालकमंत्री तसेच महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सुमारे पाचशे स्वयंसेवक संचलनात सहभागी झाले होते. आज सकाळी पावणेआठ वाजता संचलनास सुरवात झाली. कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेज या परिसरातून या संचालनालय सुरुवात झाली. शाहूपुरी परिसरातून शिस्तबद्ध रित्या हे संचलन पार पडले. संचलनात फुलांनी सजवलेल्या … Read more

‘मतदानातील नोटा पर्याय लोकशाहीला घातक’ – चंद्रकांत पाटील

आज ‘विजयादशमी’चा उत्सव देशभरासह राज्यभरात देखील मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर देश आणि महाराष्ट्रातील मान्यवर जनतेला शुभेच्छा देत आहेत. ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यावेळी मतदारांना दिलेल्या नोटा पर्यायाबाबत त्यांनी विवादित वक्तव्य केले.

चंद्रकांतदादांचं चाललंय काय ?? काश्मीरची बोंब मारल्याशिवाय जमतच नाय??

काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचा भावनिक मुद्दा कोथरूडमधील जनतेपुढे मांडण्यासाठी लडाखमधील एकमेव खासदार जमयांग त्सेरिंग नामग्याल यांना खास पुण्यात बोलावण्यात आलं आहे.

चंद्रकांत पाटलांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचा शड्डू; जिजाऊची ‘ही’ लेक लढणार कोथरुडमधून

मेधा कुलकर्णींना तिकीट नाकारलं जाणं हा महिला वर्गाचा अपमान समजून संभाजी ब्रिगेडने सोनाली ससाणे यांना चंद्रकांत पाटील यांच्यसरोधात उमेदवारी दिली आहे.

पुणेरी पाट्या लावून चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला पुणेकरांनी केला विरोध

पुणे प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या उमेदवारीला मेधा कुलकर्णींच्या कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्याच प्रमाणे कोथरूड मधील ब्राह्मण वर्गाने देखील त्यांच्या उमेदवारीला विरोध केला असल्याची चर्चा कोथरूड मध्ये जोर धरू लागली आहे. अशा सर्व नाट्यमय हालचाली होत असतानाच आता कोथरूडमध्ये पुणेरी पाट्या देखील झळकल्या आहेत. पुणेरी … Read more

चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढल्या ;मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा

पुणे प्रतिनिधी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा चंगच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला आहे. याच निर्धारातून काँग्रेस आघाडीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अद्याप देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कोथरूडचा उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मनसेला … Read more

कसं काय पाटील बरं हाय का ? कोथरूड जिंकायचं खरं हाय का?

  पुणे प्रतिनिधी | भाजपची विधानसभा निवडणुकीची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. या यादीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार स्वतः लक्ष घालणार असल्याचे बोलले जाते आहे. तर माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी वेट अँड वॉच चा पवित्रा धारण केला आहे. मागील … Read more