या बलात्काऱ्याला हाकलून द्या आणि दाखवून द्या महाराष्ट्राला..; चित्रा वाघ यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री महोदय, या बलात्काऱ्याला हालकून द्या आणि दाखवून द्या महाराष्ट्राला… या राज्यात लेकी बाळांच्या अब्रुला हात घालाल तर तुमची गय करणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या. तसंच … Read more

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल ; बेहिशोबी मालमत्तेची होणार चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (ACB) त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे समजते. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 12 फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल … Read more

पूजाच्या आत्महत्येच्या दिवशी संजय राठोड यांनी पूजाला 45 फोन केले ; चित्रा वाघ यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान आता या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केला आहे. ज्या दिवशी पूजा चव्हाणने आत्महत्या केली त्या दिवशी वन मंत्री संजय राठोड यांनी पूजाला 45 फोन केले होते. तसेच अरुण राठोडने पोलिसांच्या … Read more

शरद पवार राठोडांना पाठीशी घालणार नाहीत; मला मुख्यमंत्र्यांवरही विश्वास आहे – चित्रा वाघ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून विरोधी पक्ष भाजपने सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आपले सरकार शिवशाहीचं … Read more

Pooja Chavan Case | पुणे पोलिस रक्षक नाहीत तर भक्षक; चित्रा वाघ वानवडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल

पुणे | पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून कोणतीच कारवाई का झालेली नाही असा प्रश्न उपस्थित करत पुणे पोलिसांचे वागणे संशयास्पद असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच हे पोलिस रक्षक नाहीत तर भक्षक असल्याचा सणसणीत आरोपही वाघ यांनी केला आहे. आज वाघ या वानवडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी … Read more

लिव्ह इन म्हणजे शरीरसंबंधांचा परवाना नाही फक्त सोबत राहणं; चित्र वाघांनी अबू आझमींना फटकारले

मुंबई । लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही. अबू आझमींना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते. स्वतःला बायकोचे मालक समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यावर केली आहे. “देशात कायदाच चुकीचा आहे. कायद्यानुसार … Read more

चित्रा वाघ यांच्यानंतर भाजपच्या ‘या’ नेत्याला धमक्यांचे फोन

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं असून विरोधक आणि राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान याच प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमक्यांचे फोन आल्यानंतर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्यालाही धमकीचे फोन आल्याची तक्रार केली आहे. समता नगर पोलिस चौकीत ही तक्रार केली … Read more

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण: वाट कसली बघतायेत, संजय राठोडांच्या मुसक्या आवळा; चित्रा वाघ यांची आक्रमक मागणी

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आल्यापासून भाजप आक्रमक झालीय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कसली वाट बघतायेत, त्यांच्या मुसक्या आवळा, असं म्हणत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलीय. “पूजा चव्हाणची … Read more

रेणू शर्मांने धनंजय मुंडेवरील बलात्काराची तक्रार मागे घेताच भाजपच्या चित्रा वाघ संतप्त; केली ‘ही’ मागणी

मुंबई । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना त्यांनी लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनीदेखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, रेणू शर्मा … Read more

प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची मागणी; काँग्रेसने केलं समर्थन

मुंबई । काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथकडे जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवतवणुक केली. यावर महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या असून, महिला नेत्यांच्या कपड्यांवर हात टाकण्याची पोलिसांची हिंमत कशी होते, असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासोबतच्या पोलिसांच्या गैरवर्तनाचा फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्नचिन्ह … Read more