चिंताजनक! देशात ‘या’ वयोगटातील कोरोनाचे सर्वाधिक बळी

नवी दिल्ली । कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वयोगटाबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धक्कादायक माहिती आज जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहिल्यास देशात ६० वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत 430 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वयोगटाचा विचार … Read more

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १४ हजार पार; २४ तासात ९९१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

मुंबई । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत माहिती देणारी आकडेवारी जाहीर करण्यात आली. आज दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत ही आकडेवारी सांगण्यात आली. आकडेवारीनुसार देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आजही वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात देशभरात ९९१ कोरोनाची लागण झालेले नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांच्या नोंदीनंतर देशातील करोनाग्रस्तांची संख्या … Read more

दिलासादायक! परभणीत ‘त्या’ कोरोनाग्रस्त तरूणाच्या संपर्कातील ४३ जणांच्या टेस्ट निगेटिव्ह

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे दोन दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये पाहुण्यांना भेटायला आलेला २१ वर्षाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. त्यानंतर ग्रीनझोन मध्ये असणाऱ्या परभणी शहरांमध्ये ३ दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी उशीरा सदरील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांपैकी ४३ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासन व आरोग्य विभागाला धीर मिळाला आहे. १६ एप्रिल … Read more

धक्कादायक! अमेरिकेमध्ये लॉकडाऊन विरोधात तरुणांनी हातात घेतल्या बंदुका

वृत्तसंस्था । कोरोनामुळं जगातील इतर देशांसोबतच अमेरिकेत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेले शहर म्हणजे न्यूयॉर्क. न्यूयॉर्कमध्ये करोनामुळे आतापर्यंत आठ हजार ८०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. मात्र असं असतानाही येथील लॉकडाउन उठवण्याची मागणी काही जणांकडून केली जात आहे. न्यूयॉर्क आणि व्हर्जिनीयामध्ये काही तरुण हातामध्ये शस्त्र घेऊन ‘अ‍ॅण्टी लॉकडाउन प्रोटेस्ट’ म्हणजेच … Read more

कोरोनाचा सोन्यावर परिणाम, मागणी नसल्याने ढासळल्या किंमती; जाणुन घ्या आजचा भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरंतर वाढ झाल्यानंतर सोने आता स्वस्त झाले आहे,तर चांदीही घसरली आहे,दहा ग्रॅम सोन्याचा दर जाणून घ्या – सोन्याच्या किंमती सतत वाढल्यानंतर आता सोन्याच्या किंमती शुक्रवारी कमी झाल्या आहेत. ताज्या किंमतीनुसार १० ग्रॅम सोन्याची किंमत आता १२१५ रुपयांनी स्वस्त होऊन ४५७१३ रुपये इतकी झाली आहे.यापूर्वी गेल्या ४ दिवसांपासून सोन्याचा भाव बर्‍याच उंचीला … Read more

अन आल्प्स पर्वतावर झळकला तिरंगा; भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला स्वित्झर्लंडचा अनोखा सलाम

वृत्तसंस्था । भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. सर्वच देशांकडून या महामारीला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचं कौतुक जगभरात होत आहे. अशातच भारताने कोरोनाच्या संकटाशी दोन हात करताना असताना जगातील अनेक देशांना मदत देखील केली आहे. भारताच्या या कामाचं कौतुक जगभर होत आहे. कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईचं कौतुक … Read more

भारतीय नौदलावर कोरोनाचा हल्ला; मुंबईत १५ ते २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । भारतीय लष्कारानंतर आता कोरोनाने नौदलातही शिरकाव केला आहे. मुंबईतील नौदलाच्या तळावरील १५ ते २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व नौसनिकांचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईतीलच नौदलाच्या रुग्णालयात या नौसैनिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या किनाऱ्यावर … Read more

कोरोनाव्हायरसमुळे यावर्षी आफ्रिकेत तीन लाख लोक मारले जाण्याची भीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आफ्रिकेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आयोगाच्या अहवालात, कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे आफ्रिकेत तीस लाख लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा आकडा प्रसिद्ध करताना अहवालात म्हटले आहे की सामान्य परिस्थितीत तीन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि जर परिस्थिती बिघडली आणि हा व्हायरस थांबविण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर आफ्रिकेत ३३ … Read more

..तर यंदाचे टी-२० वर्ल्ड कप सामने मैदानातील प्रेक्षकांशिवाय होणार

वृत्तसंस्था । कोरोना संकटमुळे जगातील सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या असून यात ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेचा समावेश आहे. क्रीडा स्पर्धा कधी सुरू होतील हे आताच सांगता येणार नाही. मात्र, कोरोना संकट असताना देखील क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२०-२१च्या कार्यक्रमाबद्दल आशावादी आहे. यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचा समावेश आहे. तर भारतासोबतचा हाय व्होल्टेज … Read more

अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुक लॉन्च करणार ‘हे’ खास फिचर

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. अशातच कोरोनासंदर्भातील अनेक अफवा सोशल मीडियावर व्हायरस केल्या जातात. आता खोटी माहिती आणि अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुकने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक ‘गेट्स द फॅक्ट’ नावाचं फिचर घेऊन येणार आहे. या फिचरमुळे खोटी माहिती आणि अफवा पसरवणं थांबवण्यास मदत मिळणार आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने याबाबत … Read more