मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत केल्या ‘या’ ५ प्रमुख मागण्या

मुंबई । देशातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आरोग्य स्थितीची माहिती देऊन काही मागण्या पंतप्रधानांपुढं मांडल्या. उद्धव ठाकरे यांनी काही औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता मिळावी तसंच शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत अशा काही … Read more

खळबळजनक! पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी अटकेत असलेले ११ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह

पालघर । पालघरमधील दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकांच्या मॉब लिंचिंग प्रकरणी अटकेत असलेल्या आणखी ११ आरोपींना कोरोनाने गाठल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात अटकेत असलेल्या या सर्व आरोपींना वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, यातील ११ आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वाडा पोलीस ठाणे व बाजूलाच असलेले तहसीलदार … Read more

उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का! माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा कोरोनाने मृत्यू

मुंबई । भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. तिथंच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील मूळ गावी असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. त्यानंतर लगेचच त्यांना बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथं मागील १० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी … Read more

कोरोनामुळं T20 World Cupच्या आयोजनातून ऑस्ट्रेलिया एक्झिट घेण्याच्या विचारात

मेलबर्न । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत टी-२० विश्वचषकासारखी स्पर्धा आयोजित करण्याबद्दल बोर्डाच्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आता ऑस्ट्रेलियातील T20 World Cup 2020 चे आयोजन … Read more

…म्हणून साताऱ्यातील चव्हाण दाम्पत्याने आपल्या बाळाचे नाव ठेवलं ‘शंभुराज’

सातारा । गर्भवती असलेल्या एका महिलेला कोरोनाच्या संकट काळात गृहराज्य मंत्री  शंभुराज देसाई यांनी मदतीचा हात पुढे केला. या उपकाराची आठवण आयुष्यभर राहावी म्हणून साताऱ्यातील या दाम्पत्याने आपल्या बाळाचे नाव शंभुराज ठेवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याला वास्तव्यास असणाऱ्या रणजित चव्हाण यांच्या ९ महिन्यांनी गर्भवती असलेल्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. योग्य उपचारासाठी त्यांना नायर … Read more

राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

मुंबई । शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना मंजुरी मिळाली असून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा … Read more

‘या’ राज्याने घेतला ऑगस्टमध्ये शाळा, महाविद्यालये उघडण्याचा निर्णय

नवी दिल्ली । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये उघडण्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत. प्रत्येक राज्यातील कोरोना संक्रमणाची स्थिती वेगवेगळी आहे, त्यानुसार ही राज्ये शाळा, कॉलेज, परीक्षांबाबत आपापल्या स्तरावर निर्णय घेत आहेत. दरम्यान, सिक्किम सरकारने देखील शिक्षण संस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय एका महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. या राज्यात आता ऑगस्ट महिन्यापासून … Read more

अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी गॅबार्ड म्हणाल्या,”अशा कठीण काळात भगवद्गीता शक्ती आणि शांती देईल”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार असलेल्या तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, कोरोना संकटाच्या या अशांत काळामध्ये भगवद्गीतेतून निश्चितता, सामर्थ्य तसेच शांती मिळू शकते. हवाई येथील कॉंग्रेसच्या या ३९ वर्षीय सदस्याने आपल्या ऑनलाइन केलेल्या आवाहनात सांगितले की सध्याचा हा अराजकतेचा काळ आहे आणि उद्या काय होईल हे कुणालाही ठामपणे सांगता येत नाही आहे. गॅबार्ड … Read more

कोरोना लक्षणांमध्ये ‘या’ आणखी काही संभाव्य लक्षणांचा समावेश

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना लक्षणांमध्ये आणखी काही संभाव्य लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वास घेण्याची, चव घेण्याची शक्ती अचानक नष्ट होणं या लक्षणांचा कोरोनाच्या नव्या लक्षणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तोंडाची चव जाणं, कोणत्याही प्रकारचा वास, गंध न येणं ही कोरोनाची नवी लक्षणं असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. Loss of … Read more

कोरोना टेस्ट झाली आणखी स्वस्त; ठाकरे सरकारनं केली ५० टक्के दर कपात

मुंबई । खासगी लॅबमध्ये होणाऱ्या कोविड चाचणीच्या दरात तब्बल ५० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारनं घेतला आहे. कोविड रुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. आयसीएमआरनं निश्चित केलेले कोरोना चाचणीचे ४ हजार ५०० रुपये हे शुल्क रद्द करत नवीन दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले होते. या निर्देशानुसार ठाकरे सरकारनं चाचण्यांच्या दरात थेट ५० टक्क्यांनी … Read more