कराडमधील पवन सोळवंडे खून प्रकरणात जे. बाबा टोळीवर मोक्का
कराडमधील पवन सोळवंडे खून प्रकरणातील संशयित जुनेद शेख व त्याच्या जे बाबा टोळीवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली. या बाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वीनी सातपुते यांनी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यान ही कारवाई करण्यात आल्याच पोलिसांनी सांगितले.