महाराष्ट्रातून इंदौरकडे निघालेल्या कामगार पती पत्नीला टँकरने उडवले; ४ जण ठार

वृत्तसंस्था । महाराष्ट्रातून इंदौरच्या दिशेने पायी प्रवास करणाऱ्या कामगार पती पत्नीला आज सकाळी एका टँकरने उडवल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील बारवानी येथे हा अपघात झाला असून यात स्थलांतरी कामगार आणि त्याची पत्नी व अन्य दोघे असे एकूण चार जण जागीच ठार झाले आहेत. Madhya Pradesh: A migrant worker and his wife and 2 other … Read more

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात ५० माकडांचा रहस्यमयरीत्या मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाच्या संकटात वाढ होत असतानाच कर्नाटकातील एका जिल्ह्यात जवळपास ५० माकडे मृतावस्थेत आढळून आली आहेत. यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. त्या माकडांवर विषप्रयोग करण्यात आला असावा अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. हे कोणत्या कारणास्तव केले गेले, याबद्दल सध्या काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माकडांच्या या … Read more

मजुरांच्या वाहनाला अपघात; २४ जण जागीच ठार

औरैया । आज पहाटे उत्तर प्रदेशातील औरैया येथे झालेल्या भीषण अपघातात २४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. आपापल्या घरी निघालेल्या मजुरांच्या ट्रकला दुसऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. पहाटे ३:३० वाजता झालेल्या या अपघातात २३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ ते २० जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात … Read more

धक्कादायक! पित्यासह सावत्र आईच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे बापानेच स्वतःच्या पोटच्या मुलीचा छळ करून, दुसऱ्या पत्नीच्या साथीने अमानुष मारहाण केल्याने मुलीचा मृत्यु झाल्याची दुःखद घटना वाळवा येथे घडली. सुहाना ख्वाजासाहेब मोमीन असे त्या अभागी मुलीचे नाव असुन, सावत्र आई आसमा ख्वाजासाहेब मोमीन हिच्या साथीने ख्वाजासाहेब इस्माईल मोमीन याने त्या मुलीला क्रूर निर्दयीपणे मारहाण केल्यानेच त्या मुलीचा मृत्यु झाल्याचे … Read more

धक्कादायक ! सायकल लपवल्याच्या कारणातून तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा येथे सायकल लपवल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी सायंकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. दारूच्या नशेत या तरुणाचा बळी घेतल्याची चर्चा नागरिक करत होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की या दोघांनीही … Read more

कोरोनाबाधित जवानाची गळफास घेऊन रुग्णालयातच आत्महत्या

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही यापार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन १८ मे नंतरही सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे. देशात सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, शासकीय अधिकारी आणि जवान हे सुद्धा कोरोनाचे शिकार झाले आहे. अशात कोरोनाची बाधा झालेल्या एका जवानाने रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सदर … Read more

धक्कादायक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचा १४ वा बळी; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात मृत्यूचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. कालपर्यंत १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यात आज पुन्हा रामनगर येथील ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचा १४ वा बळी गेला आहे. अशी माहिती माध्यम समन्वयक अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. रामनगर येथील ८० वर्षीय … Read more

सेल्फीच्या नादात महिलेचा मृत्यू; तिसर्‍या मजल्यावरुन खाली पडल्याने अंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राजस्थानमधील बीकानेरमध्ये सेल्फीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी तिने तिच्या फ्लॅटच्या तिसऱ्या मजल्यावर चढून सेल्फी घेत होती. त्याच वेळी तिचे संतुलन बिघडल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी नेट असतानाच तिचा मृत्यू झाला. बीकानेरच्या सुजनादेसरच्या गंगा रेसिडेन्सीमध्ये हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे कुसुम तंवर … Read more

धक्कादायक! मशरुम खाल्ल्याने ६ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मेघालयातील पश्चिम जेंटिया हिल्स जिल्ह्यातील दुर्गम गावात सहा लोकांचा मृत्यू झालेल्या विषारी मशरूमची ओळख अमानिता फेलो म्हणून झाली आहे. शनिवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की याला सामान्यतः ‘डेथ कॅप’ मशरूम म्हणतात. गेल्या महिन्यात, अमलरेम नागरी उपविभागामध्ये भारत-बांग्लादेश सीमेजवळील लमीन गावच्या सहा जणांचा मशरूम खाऊन मृत्यू झाला होता.त्यांनी ते जवळच्याच जंगलातून तोडून … Read more

धक्कादायक! घरी फोन करण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून मजुराकडून मजुराचा खून

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी गावच्या हद्दीत दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कत्राटदाराकडे काम करणाऱ्या परप्रांतीय मजूराचा घराकडे फोन करण्यासाठी मोबाईल न दिल्याच्या कारणावरून लोंखडी रॉडने मारहाण करून व गळा दाबून खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कवठेमहांकाळच्या पोलीसांनी आरोपीस गुरूवारी अटक केली आहे. सिंकदर हरीप्पा गंजू … Read more