भाजपच्या दिग्गजांना धक्का ; चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंनी स्वतःच्या गावातील ग्रामपंचायती गमावल्या

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीत पराभव पत्करावा लागला आहे. तर भाजप नेते नितेश राणे आणि राम शिंदे यांच्या हातूनही ग्रामपंचायत निसटल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे कोल्हापुरातील खानापूर … Read more

ग्रामपंचायत निवडणुक २०२१। ….म्हणून ‘या’ गावात निकाल पाहायला गावकरीच उरले नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत देखील महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या नांदेडमधील एक गाव चांगलेच चर्चेत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत मुतण्याळ या गावातील प्रतिस्पर्धी गटांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यामुळे … Read more

चर्चा तर होणारच, भोसरे गावात एकाच घरातील चौघेजण ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

सातारा प्रतिनिधी | ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. १५ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होईल. या निवडणुकीत एक आगळाच प्रयोग खटाव तालुक्यातील भोसरे या गावात पहायला मिळाला आहे. गावातील सत्ताधारी आणि विरोधी हे दोन्ही पक्ष गावातील महत्त्वाच्या प्रश्नांवर गप्प बसतात, भ्रष्टाचार झाला तरी त्यासंदर्भातील व्यक्तीला पाठीशी घालतात, सामान्य जनतेचं म्हणणं विचारात … Read more

चंद्रकांत पाटलांच्या गावातच आघाडीत बिघाडी ; अजित पवार म्हणतात…

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रपणे महाविकास आघाडी सरकार चालवत असले तरी स्थानिक पातळीवर वर अशीच आघाडी आहे असं नाही. त्यातच आश्चर्य म्हणजे भाजपचे मोठे नेते चंद्रकांत पाटील यांच्याच गावात चक्क काँग्रेस – राष्ट्रवादीने भाजपला साथ दिली असून शिवसेनेला एकाकी पाडलं आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले … Read more

दिलासादायक! पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार; निवडणूक आयोगाचे नवीन आदेश

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना सर्वर डाऊन व कनेक्टिव्हिटी येत नसल्याने मागील दोन दिवसापासून इच्छुक उमेदवार केंद्रप्रमुख यांची झोप उडाली होती. महाईसेवा केंद्रांच्या समोर रात्रभर जागे राहूनही ऑनलाइन अर्ज भरताना येत नव्हते. त्यातच बुधवार 30 डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने निर्धारित वेळत अर्ज दाखल … Read more

लोकशाहीचा बाजार! नाशिक जिल्ह्यात सरपंचपदाचा लिलाव; लागली कोट्यवधींची बोली

नाशिक । राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक गटांची सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. या साऱ्यात नाशिक जिल्ह्यातील एका घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Auction for the post of Sarpanch) जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे येथे चक्क सरपंच पदाचा लिलाव करण्यात आला … Read more

ग्रामपंचायत उमेदवारांना ‘ही’ अट आली आडवी; अनेकांचा पत्ता झाला कट, तर बाकींची अर्ज भरताना होतेय दमछाक

मुंबई । (Gram Panchayat Election) ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलं असली तरी ग्रामपंचायती रिंगणात इच्छुक उमेदवारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 7 वी पासची टाकण्यात आलेली अट, उमेदवारी अर्ज भरण्यात सलग तीन सुट्ट्यांनी घातलेला खो आणि ऑनलाईन अर्ज भरताना काही ठिकाणी येत असलेल्या तांत्रिक अडचणी यामुळे इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नव्या जीआरमुळे इच्छुकांचा … Read more

शिवसेनेशी स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या! आपल्याला त्यांसोबत कायम राहायचंय; अजितदादांच्या कार्यकर्त्यांना सूचना

Ajit Pawar

मुंबई । राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची खलबतं झाल्याची माहिती आहे. त्यानुसार, मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. “आपल्याला शिवसेनेबरोबर (Shivsena) कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी‌ झाल्यानंतर स्थनिक पातळीवर खटके उडत आहे पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या” अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री … Read more

महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकही एकत्र लढणार का? जयंत पाटील म्हणाले…

Jayant patil

सातारा । महाराष्ट्रात पुढील महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक होऊ घातल्या आहेत. त्यामुळं पदवीधर, शिक्षक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ज्याप्रमाणे एकत्र आले होते त्याप्रमाणे त ग्रामपंचायत निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. त्यांनी साताऱ्यात समाज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीतही एकत्र लढण्याचा निर्णय … Read more

निवडणुकीनंतरच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीवर जानकर संतापले, म्हणाले..

मुंबई । राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत. अशावेळी ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी विरोध केला आहे. गावच्या प्रस्थापितांच्या हातात रिमोट जाईल, आणि घोडेबाजारही थांबणार नाही, अशा शब्दात जानकरांनी संताप व्यक्त केला. (Gram Panchayat Election Sarpanch Lottery after polls) … Read more