विजयराज खुळे शिवसेनेत, सुनील तटकरे यांना मोठा धक्का

रायगड प्रतिनिधी | रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते विजयराज खुळे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी आमदार भरत गोगावले, माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, प्रमोद घोसाळकर उपस्थित होते. अलीकडेच सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे, भाऊ … Read more

सांगलीत विधानसभा उमेदवारीवरून आयारामांविरुद्ध भाजप निष्ठावान आक्रमक

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे सांगलीत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारीवरून संघर्ष उफळण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये ऐन वेळी आलेल्यांना आणि आयात केलेल्यांनाच उमेदवारी दिली जात आल्याचा आरोप होत असतानाच आता पक्ष वाढीसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आवाज उठवण्यास सुरवात केली आहे. बुधगाव मध्ये भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेबाबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली … Read more

विरोधी पक्ष नेते दाखवा आणि बक्षीस मिळवा ; रघुनाथदादा पाटील

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे काँग्रेस आघाडीच्या भ्रष्ट सरकारला कंटाळून शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्यात भाजप-सेना युतीचा पर्याय निवडला. मात्र मागील पाच वर्षात सरकारचे धोरण बदलले नाही, शेतकरी विरोधात कायदे केले. शेतमालाचे दर पाडण्यात आले. देशात आर्थिक मंदी आली असून शेतकरी कामगार कष्टकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी कोल्हापुरात मंगळवारी शेतकरी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात … Read more

सांगली, मिरज विधानसभेच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे मागील काही वर्षात जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुका आठवडा भरात जाहीर होणार असून सांगली, मिरज आणि तासगाव-कवठेमंकाळ या विधानसभेच्या जागा सेनेला मिळाव्या म्हणून जिल्हा शिवसेना संघटन आग्रह धरत आहेत. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सांगितले. जिल्ह्यातील माजी आमदार सेनेच्या संपर्कात असून … Read more

संजय काकांकडून घराणेशाहीचा आरोप म्हणजे विनोद- विशाल पाटील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ‘लोकसभा निवडणुका होवून पाच महिने होत आले असले तरी खा. संजयकाका पाटील हे निवडणुकीमधून बाहेर आलेले नाहीत. तासगाव व कवठेमहांकाळ येथे बोलताना त्यांनी आमच्यावर घराणेशाहीचा आरोप केला. जे स्वत:च्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी मागतात, ज्यांचे संपूर्ण राजकारण घराणेशाहीवर अवलंबून आहे, अनेक घराण्यांनी त्यांना मदत केलेली आहे असे असताना त्यांच्याकडून आमच्यावर होणारा … Read more

मुख्यमंत्र्यांनी सातारकरांची मने जिंकली – शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत आदेश द्यायचे असे वक्तव्य काल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी साताऱ्यात महाजनादेश यात्रेच्या सभे दरम्यान केले होते हे वक्तव्य करून 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींनी केलेल्या मागण्या मान्य करून सातरकरांची मने जिंकली आहेत. सातारच्या हद्दवाढीचे घोंगडे गेली कित्येक वर्षे भिजत पडले होते त्या बाबत या आधी सुद्धा शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांना … Read more

नांदेडमध्ये भाजपकडून विधानसभेच्या १० जागांसाठी १०० उमेदवार इच्छुक

नांदेड प्रतिनिधी | विधानसभेसाठी ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी भाजपकडे मोठी भाऊगर्दी होतांना दिसत आहे. गुरुवारी नांदेड जिल्ह्यामध्ये राज्यमंत्री रणजीत पाटिल यांनी भाजपाकडुन ईच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नांदेडच्या 9 विधानसभेच्या जागांसाठी 100 हुन अधिक ईच्छुकांनी मुलाखत दिली. 2014 पुर्वी भाजपाकडे ईच्छुक उमेदवारांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. आता मात्र राज्यासह देशभरात भाजपचे वातावरण असल्यामुळे भाजपमध्ये आमदार बनण्यासाठी भाऊगर्दी … Read more

पाथरी विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भूमिपुत्रांची फिल्डींग

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे  ऑक्टोबर मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाथरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दोन वेळा सुरुंग लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक वेळ अपक्ष यशस्वी झालेले आहेत. 1990 पासून सलग तीन वेळा शिवसेनेने माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या रूपाने हॅट्रिक केली होती. 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे … Read more

हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

सोलापूर प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीला आणखी एक मोठा राजकीय हादरा बसणार असे संकेत मिळत आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पूर्वीपासून निकटवर्तीय असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपाच्या वाटेवर जाणार असल्याच्या हालचाली दिसून येत आहेत. हर्षवर्धन पाटलांनी आज बुधवार दि. ४ रोजी अकलूज येथे जाऊन विजयदादा यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद … Read more

उस्मानाबाद काँग्रेसला मोठे खिंडार, जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांचा शिवसेनेत प्रवेश

उस्मानाबाद प्रतिनिधी| अनेक नेत्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इनकमिंग-आउटगोइंगचे उस्मानबाद जिल्ह्यात पण पाहायला मिळाले. राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. त्याचा प्रत्यय म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष प्रशांत चेडे यांनी काँग्रेसच्या 3 तालुकाध्यक्ष आणि डझनभर जिल्हा परिषद सदस्यांनी पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. या सर्वांनी राजीनामे दिल्यानंतर हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत … Read more