‘विरोधकांची टीका म्हणजे, उचलली जीभ लावली कि टाळ्याला’; अशोक चव्हाणांचा पलटवार

मुंबई । मराठा आरक्षणासारख्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मुद्यावर विरोधी पक्षातले अनेक नेते बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत. या मुद्यावर त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे. त्यांच्या हाताला सध्या काहीच काम नाही. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना राज्याचे सार्वजनिक … Read more

धक्का! सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालाच्या घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे. मराठा आरक्षणावर आज पहिल्यांदाच पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. घटनापीठासमोर बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच न्यायाधीशांची समिती नेमली होती. यावेळी राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी आरक्षणाची जोरदार बाजू मांडत आहेत. दरम्यान, आजच घटनापीठासमोर मराठा आरक्षणाचे प्रकरण आलं आहे. त्यावर विचार … Read more

‘अनिश्चिततेची तलवार मराठा समाजाच्या डोक्यावर आणखीन किती दिवस ठेवणार?’- संभाजीराजे

Sambhaji Raje

मुंबई । मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation)सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सर्वोच्च न्यायायाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यासाठी, महाराष्ट्र सरकार तयार असल्याचं सांगतानाच, दुसरी बाजूही भक्कम असायला हवी, असे मत खासदार संभाजीराजे भोसले (sambhaji raje bhonsale)यांनी व्यक्त केलं आहे. संभाजीराजेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन उद्याच्या सुनावणीसंदर्भात माहिती … Read more

छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेणार भेट; ‘या’ दिवशी करणार ‘आरक्षण पे चर्चा’

मुंबई । राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले येत्या 2 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित असणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी 2 डिसेंबरला खासदार संभाजीराजे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. ही … Read more

फडणवीसांना मुख्यमंत्री करा! ३ महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा

मुंबई । “इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलंत तर तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे यांनी राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. त्यांनी ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप … Read more

महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही, गडकरींची जोरदार टीका

नागपूर । ”महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. त्याशिवाय ते पुढेच नाही,” असा टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लगावला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असल्याचं गडकरी म्हणाले. ‘नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची … Read more

जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवला ; उदयनराजेंचा रोख जेष्ठ नेत्यांवर

udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाचं आरक्षणं हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. असा गंभीर आरोप भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. मंडल आयोगलागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही असा थेट सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांना सोयीप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला. या मुद्द्यावर राज्य सरकारनं पुढाकार … Read more

राज्यात अनेक वर्षे सत्ता, तरी यांना मराठा आरक्षण देता आलं नाही; पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर घणाघात

परभणी । ”राज्यात अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही,” अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. विधानपरिषद पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी परभणीत आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या. (Maratha reservation) राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होत आहेत. औरंगाबाद मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या … Read more

मराठा आरक्षण: ‘पुण्यात पंतप्रधान मोदींचा रस्ता अडवू!’ मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक

पुणे । पुणे दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा रस्ता मराठा क्रांती ठोक मोर्चाने (Maratha Kranti Thok Morcha) अडवण्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोके मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील (Abasaheb Patil) यांनी ही घोषणा केली. “मराठा समाजाला ना राज्याच्या सुविधा मिळत … Read more

राज्य सरकारने मराठा तरुणांच्या पाठीत खुपसलेला खंजीर महागात पडेल- चंद्रकांत पाटील

मुंबई । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करुन मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे”, अशी घाणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर केली आहे. “राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे … Read more