“शाहरुख, तू जामियाचा विद्यार्थी असूनही गप्प का ?”; बॉलीवूडच्या इतर दिग्गजांचेही मौनच

बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ काम केलेल्या अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, करण जोहर, हृतिक आणि राकेश रोशन, अक्षय कुमार यांच्याकडून मात्र देशभरातील हिंसक वातावरणावर अद्यापही प्रतिक्रिया आलेली नाही

‘स्वतःचा गोंधळ समोर येऊ नये म्हणून विरोधकांचा गोंधळ’; खासदार सुप्रिया यांचा आरोप

दोन दिवसापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनात विधीमंडळात पहिल्याच दिवशी विरोधकांनी  सावरकर यांच्याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून गोंधळ घातला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीचे विधिमंडळाच्या कामकाजास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.

अहमदनगरमध्ये राजकीय वादातून गोळीबार; सरपंचाचा मृत्यू

पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे गावातील राजकीय वादातून झालेल्या गोळीबारात सरपंचाचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे (वय 50) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा; 3 सदस्यीय खंडपीठाने सुनावली शिक्षा

परवेझ मुशर्रफ यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येसह देशात आणीबाणी लादणे, सत्ता उलथविणे, संविधान नष्ट करणे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना अटक करणे आदी आरोप परवेझ मुशर्रफ यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

कल्पनेचे उद्योगधंद्यामध्ये रूपांतर करणे आवश्यक – डॉ. जेरे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व उपक्रम केंद्राद्वारे आयोजित क्लस्टर लेव्हल ‘इनोव्हेशन 2 एंटरप्राईज’ (आय २ ई) स्पर्धेचे उद्घाटन केंद्र सरकारच्या मानव विकास मंत्रालयाचे चीफ इनोव्हेशन ऑफीसर डॉ. अभय जेरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

या राज्याचे मुख्यमंत्री ‘बेपत्ता’; शहरभरात झळकले ‘मुख्यमंत्री बेपत्ताचे’ बॅनर

बिहारची राजधानी पटना शहरात सध्या एक विचित्र गोष्ट दिसत आहे. या शहरात ठिकठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार बेपत्ता असल्याचे बॅनर्स दिसत आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर नितीश कुमार यांचा फोटो देखील आहे.

‘आयएनएस विराट’ चा लिलाव आज; संरक्षण मंत्रालयाचा निर्णय  

ऑनलाइन बोलीद्वारे ही नौका भंगारात काढण्यासाठी रवाना केली जाईल. यामुळे मुंबईतील गोदीत चार ते सहा युद्धनौकांचा तळ नौदलाला मिळणार आहे.

मराठमोळे मनोज नरवणे होणार नवे लष्करप्रमुख; जनरल बिपीन रावत ३१ डिसेंबरला निवृत्त होणार

नवीन लष्करप्रमुख निवडताना सेवाज्येष्ठतेचाच विचार करण्याचा निर्णय केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने केला आहे. त्यामुळे मराठी मुलुखातील मूळ पुण्याचे असलेल्या लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हेच आता देशाचे पुढील लष्करप्रमुख असतील.

भारत रशियाकडून खरेदी करणार आण्विक पाणबुडी; पश्चिम समुद्री ताफ्याची मागणी

सातत्याने शत्रूराष्ट्राकडून घुसखोरीची शक्यता असलेल्या पश्चिम समुद्री ताफ्याला आता आण्विक पाणबुडी मिळण्याची अपेक्षा आहे. अशी पाणबुडी रशियाकडून खरेदी करण्याचा करार अंतिम टप्प्यात आला असून, ही पाणबुडी याच महिन्यात नौदलाकडे सुपूर्द होणार आहे. त्यानंतर ती महिनाभरात मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

नागरिकत्व विधेयका विरोधात ‘एमआयएम’ आक्रमक; विधेयक रद्द करण्यासाठी केली निदर्शने

नागरिकत्व विधेयका विरोधात देशात रान उठले आहे. संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये लोक रस्त्यावर उतरत असून या निर्णयाला विरोध दर्शवत आहेत.