संजय राऊत यांनी राहुल गांधींना उत्तर देण्याचं जे धाडस दाखवलं त्याच कौतुकच आहे..

काँग्रेसचा वीर सावरकरांना विरोध असतानाही संजय राऊत यांनी हा सल्ला देण्याचं धाडस दाखवलं त्याचं मी कौतुक करतो असंही रणजीत सावरकर म्हणाले आहेत.” एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

इतिहासावरच किती दिवस बोलत बसायचं? आदित्य ठाकरेंनी लगावला संजय राऊतांना टोला

सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन जे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे ती पक्षाची भूमिका नाही असं आदित्य ठाकरे यांनी आता स्पष्टीकरण दिल आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे. शिवाय, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी त्यांना टोला लगावत इतिहासावरच किती दिवस बोलत बसायचं? असं म्हटलं आहे.

संजय राऊतांकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची पुन्हा एकदा मागणी; काँग्रेस काय भूमिका घेणार?

शिवसेना खासदार संजय राऊतांकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची पुन्हा एकदा मागणी, शिवाय, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं वक्तव्य राऊत यांनी केलं.

मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न दिल्यास आम्ही विरोध करू ; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण

नवी दिल्ली : सावरकरांनी इंग्रजांकडे मागितलेल्या माफीचा इतिहास नष्ट करता येणार नाही. अशा परिस्थितीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न दिला तर आम्ही निषेध करू, तसेच त्याचा विरोध करू, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले की, सावरकर हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व … Read more

कर्नाटकी दहशतवादाचा महाराष्ट्र भाजप निषेध करेल काय? संजय राऊत उद्या बेळगाव दौऱ्यावर

टीम हॅलो महाराष्ट्र : बेळगाव सीमा प्रश्नी लढताना हौताम्य पत्करलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यापासून राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून रोखण्यात आले. तसेच कर्नाटक पोलिसांकडून राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांना धक्काबुकी करण्यात आली. या प्रकरणी संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा निषेध करेल काय, असा प्रश्न संजय राऊत यांनी … Read more

राजकीय बेरोजगारांनो, राज्य अशांत कराल तर जनता माफ करणार नाही – संजय राऊत

 उदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे द्यावे आणि करीम लालाला इंदिरा गांधी भेटत असतं या विधानानंतर गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊतांवर भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार टीका होतं आहे. कालच त्यांनी माफी मागत इंदिरा गांधीविषयी केलेले विधान मागे घेतले. मात्र उदयनराजे समर्थक संजय राऊत यांच्या विरोधात अजूनही आक्रमक आहेत. सोशलमीडियावरही संजय राऊत यांना या मुद्यावरून ट्रोल करण्यात येत आहे. काल सातारा बंद ठेवण्यात आला आज सांगली बंद ठेवण्यात येत आहे. कराडमध्ये त्यांच्या फोटोची गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली. संजय राऊत यांच्या विरोधात बोलणाऱ्या या मंडळींवर राऊत यांनी आता ट्विटरवरून निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांना पदावरून हाकला! संभाजी भिडेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मागणी

संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात उदयनराजेंना शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्या म्हणून विचारणा केली होती. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं राजकारण चांगलंच तापलं असतांना या वादात आता शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी उडी घेत राऊत यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. ‘छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. या परंपरेचा वा वंशजांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पदावरून हाकला,’ अशी मागणी भिडे यांनी केली आहे.

”मोदींना पेढेवाले म्हणणाऱ्यांबरोबर भाजपा असल्याचा आनंद”; शिवसेनेचा सामनातून भाजपला टोला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात उदयनराजेंना शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्या अशी विचारणा करत वादाला आमंत्रण दिलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजपने मैदानात उडी घेत राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. राऊत यांचे वक्तव्य हा शिवरायांचा अपमान आहे असं म्हणत भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवसेनेनं भाजपच्या टीकेला आज समानाच्या अग्रलेखातून प्रतिउत्तर दिलं. शिवसेनेनं उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही वर्षांपूर्वी साताऱ्यातील पेढेवाल्यांशी केलेल्या तुलनेवरुन अग्रलेखातून भाजपाला सुनावले आहे.

कोल्हापुरात संजय राऊत यांच्या विरोधात भाजपाने केलं निदर्शन

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपने जोरदार निदर्शने करत संताप व्यक्त केलाय. शिवसेनेचे संजय राऊत म्हणजे वाचाळवीर असल्याची टीका भाजपा महानगर अध्यक्षांनी केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात इंदिरा गांधींबद्दल आदर होता – आदित्य ठाकरे

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानाबाबत आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ”संजय राउत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्वतः इंदिरा गांधींबद्दल आदर होता. त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकाकडून त्यांच्याबद्दल अपशब्द येणार नाही.” अशी प्रतिक्रिया प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी वादावर पडदा टाकण्याचं प्रयत्न केला