संजय राऊतला सत्तेचा माज चढलाय, त्याच मानसिक संतुलन बिघडलंय – नारायण राणे

टीम हॅलो महाराष्ट्र : संजय राऊत या माणसाला सत्तेचा माज चढलाय, त्याच मानसिक संतुलन बिघडलंय, अशी जोरदार टीका खासदार नारायण राणेंनी केली आहे. भावाला मंत्रिपद मिळालं नाही तेव्हापासून राऊत अशी वक्तव्य करत असल्याचे राणे यांनी सांगितले. छत्रपती आमचं दैवत आहे, आमच्या देवतांबद्दल, त्यांच्या घराण्याविषयी वेडंवाकडं बोलला तर जीभ जाग्यावर राहणार नाही, याद राखा असा इशाराही … Read more

इंदिरा गांधींविषयीच्या ‘त्या’ दाव्यावरून संजय राऊत यांचा युटर्न, मागितली माफी

मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवर केलेले वादग्रस्त विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मागे घेतले आहे. ते म्हणाले की, ‘माझ्या विधानामुळे कुणाला दुखावले असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो. मी कॉंग्रेस नेत्यांना नेहमीच पाठिंबा देत आलो आहे. कॉंग्रेसच्या आक्षेपावर संजय राऊत म्हणाले, ‘मी नेहमी इंदिरा गांधी, पंडित नेहरू, राजीव गांधी आणि गांधी परिवाराबद्दल आदर दाखवला … Read more

काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का?; संजय राऊत यांच्या विधानानंतर फडणवीसांचा सवाल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पुण्यात एका कार्यक्रमामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीमलाला याला भेटायच्या असे विधान केले होते. त्यावरुन विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. संजय राऊत यांच्या विधानांवर काँग्रेसने खुलासा करावा, अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता केली आहे.

काँग्रेसला अंडरवर्ड पैसे पुरवत होते काय? फडणवीसांचा थेट सोनिया गांधींना सवाल

मुंबई | माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी अंडरवर्ड डाॅन करिम लाला याला भेटत होत्या असा धक्कादायक खुलासा शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी केला होता. आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन काँग्रेस पक्षाला धारेवर धरले आहे. काँग्रेसला अंडरवर्ड पैसे पुरवत होते काय? असा सवाल फडणवीस यांनी थेट सोनिया गांधींना विचारला आहे. संजय … Read more

संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेस नेते संतापले, माफी मागण्याचे केले आवाहन

पुणे प्रतिनिधी । काल पुण्यातील एका कार्यक्रमात दिलेल्या जाहीर मुलाखतीत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान केलं होत. या विधानानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला असून संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. संजय निरुपम आणि मिलिंद देवरा या मुंबई काँग्रेसच्या दोन्ही माजी अध्यक्षांनी संजय राऊत … Read more

संजय राऊतांविरोधात भाजप आमदार राम कदमांची पोलिसांत तक्रार

मुंबई | भाजप आमदार राम कदम शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे समजत आहे. राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा दाखवा असं म्हणुन चॅलेंज दिले आहे. याविरोधात भाजप आता आक्रमक झाली असून राम कदम राऊतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी … Read more

छत्रपतींच्या वंशजांचा पराभव घडवून आणला, त्याबद्दल भाजप शिवरायांच्या वंशजांची माफी मागणार काय? – संजय राऊत

मुंबई : छत्रपती ऊदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला. हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे. त्याबद्दल भाजपा शिवरायांच्या वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत हा प्रश्न विचारला आहे. त्यांनी म्हंटले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपतींच्या प्रत्येक … Read more

‘भाजपवाले शब्द पाळणार नाहीत, त्याची सर्वात आधी खात्री मला होती’ – खासदार संजय राऊत

‘भाजपावाले दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं.’ असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पुण्यात आयोजित लोकमत पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात राऊत राऊत यांनी बोलताना सांगितलं. 

उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा – खासदार संजय राऊत

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी पक्षातून ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असं नाव करावं असा टोला लगावला होता. तसेच शिवसेनेकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्या टीकेला याच टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे.

‘समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड दाऊद असो, मी कुणाला घाबरत नाही! खासदार संजय राऊत

‘समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड असो, मी कुणाला घाबरत नाही. तुम्ही घाबरला नाहीत, तर तुमचं कुणी वाकडं करून शकत नाही’, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.