कर्मचाऱ्यांच्या संपातही लालपरी रस्त्यावर सुसाट 

ST

    औरंगाबाद – एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी 8 नोव्हेंबर पासून संपावर आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्यानंतर औरंगाबाद विभागात टप्प्याटप्प्याने बस सेवा पूर्वपदावर येत आहे. काल दिवसभरात विविध मार्गांवर 104 बस मधून 3 हजार 571 प्रवाशांनी प्रवास केला. शिवाय पुणे, नाशिक मार्गावर 23 शिवशाही सोडण्यात आल्या होत्या. … Read more

सातारा जिल्ह्यातील 397 एसटी कर्मचारी निलंबित तर 95 जणांची सेवा समाप्ती

ST employee

सातारा | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीवर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. सातारा विभागातील 11 आगारातील सुमारे 397 कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले असून आजपर्यंत 95 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. सातारा विभागातील विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा तसेच अकरा आगारातील सोमवारी 397 कर्मचारी आत्तापर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. … Read more

बालाजी ट्रस्टकडून संपातील एसटी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक किटचे वाटप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा बस आगारातील संपात सहभागी कर्मचाऱ्यांना बालाजी ट्रस्ट आणि गुरुकुल स्कूल यांच्यामार्फत आंदोलक एसटी कर्मचारी यांना जीवनावश्यकचे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, जेष्ठ पत्रकार शरद काटकर यांच्यासह सहकारी उपस्थित होते. सातारा येथे गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा शासनात विलनीकरण करण्यासाठी संप सुरू आहे. डिसेंबर महिन्यात शासनाकडून संपकरी … Read more

साताऱ्यातील मेढा डेपोतील एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

सातारा | सातारा जिल्ह्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. संतोष वसंत शिंदे (वय-34, रा. आसगाव, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नांव आहे. तटपुंजा पगार व संपामुळे संतोष शिंदे तणावाखाली होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील आसगाव येथील संतोष शिंदे तीन वर्षापासून मेढा एसटी … Read more

विधानसभा निवडणुकीत दगाफटका करून अमर, अकबर, अँथनीचे सरकार आले; रावसाहेब दानवेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावरमधील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर विधानसभा निवडणुकीवरून टीका केली. “या राज्यातली जनता महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट कौल जनतेने दिला पण दगा फटका करून अमर, अकबर, अँथनीचे सरकार सत्तेवर आले. मात्र, 2024 … Read more

एसटी कर्मचाऱ्यांबाबत काय करायचे हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही; अजित पवारांच्या भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन केले जात आहे. यात भाजप नेत्यांकडून राजकारण केले जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. “एसटीचे कर्मचारी हे आमचेच आहेत. त्यांच्या हिताचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सर्वजण घेत आहोत. मात्र, काहींकडून राजकारण केले जात आहे. आम्हाला योग्य निर्णय … Read more

कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, आंदोलन करू नका; मुख्यमंत्र्यांचं भावनिक आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. तसेच कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात आंदोलन सुरू आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना साद घालत भावनिक आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, आंदोलन करू नका अशी कळकळीची विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. … Read more

‘या’ जिल्ह्यातील 58 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

सांगली | ऐन सणासुदीच्या काळात मागण्या मान्य करूनही संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास आता एसटी महामंडळाने सुरवात केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशानंतर राज्यात सर्वत्र कारवाई करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातही अचानक संपावर गेलेल्या 58 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये आटपाडी आगारातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांनी भाजपचे आमदार … Read more

विविध मागण्यांसाठी : साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालयात धरणे

सातारा | एसटी कर्मचाऱ्यांना 16 टक्के महागाई भत्ता त्वरित लागू करावा, कोविड काळातील वैद्यकीय बिलांची रक्कम अद्यापही मिळाली नसून ती तत्काळ वर्ग करावी, यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा विभागीय कार्यालयाबाहेर धरणे धरण्यात आली. शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2019 पासून पाच टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यात आला. परंतु, आता भत्त्यात वाढ करून … Read more

एसटी कर्मचाऱ्यांना पगाराची प्रतीक्षा

ST employee

औरंगाबाद | एसटी कर्मचाऱ्यांवर मागील महिन्याचा पगार न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. ऑगस्ट महिना उजाडला असला तरीही या कर्मचाऱ्यांना अद्यापही जुलै महिन्याचा पगार मिळाला नसल्यामुळे बऱ्याच जणांना उसणे पैसे घेऊन कुटुंबियांचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळातील अडीच हजार कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार मिळालेला नाही. यामुळे आता पगार केव्हा होईल याकडे कर्मचारी वर्गाचे … Read more