राज्यातील सिनेमागृह सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आता शाळा, मंदिरे यांच्यानंतर राज्यातील सिनेमेगृह देखील सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे. येत्या 22 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व सिनेमागृह सुरू होतील. त्याचबरोबर नाट्यगृहांबाबतही राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आज मुख्यमंत्री उद्धव … Read more

आरोग्यमंत्री साहेब, वसुलीचा आकडा ठरलं नसल्यामुळे परीक्षा रद्द झाली का?? सदाभाऊंचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर निशाणा साधला. अहो आरोग्यमंत्री साहेब, वसुलीचा आकडा ठरलं नसल्यामुळे परीक्षा रद्द झाली आहे का? असा … Read more

७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना प्रादुर्भाव मुळे अनेक दिवसांपासून राज्यातील बंद असलेली मंदिरे पुन्हा एकदा उघडण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे उघडण्याा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र … Read more

राज्यातील शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला असून 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव मुळे राज्यातील शाळा बंद होत्या. परंतु आता शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्या बाबत एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी यासाठी मान्यता … Read more

अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो; गडकरींचा शब्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजितदादा,तुम्ही फक्त मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो असा शब्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. पुण्यात आज सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, मुंबईतील वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं आहे. … Read more

दरेकरांच्या मुंबै बँकेची चौकशी सुडबुद्धीने नाही; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सहकार विभागाने प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँक कथित गैरव्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ३ महिन्यांत यासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर प्रवीण दरेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्या बँकेला ऑडिटरने A ग्रेड … Read more

महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील; शिवसेनेचा राज्यपालांवर प्रहार

raut koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहल्यानंतर पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध सरकार असा सामना रंगला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून राज्यपालांवर जोरदार प्रहार केला आहे. महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका, असा इशारावजा धमकीच राज्यपालांना देण्यात आलीय. … Read more

किरीट सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन जमिनी शोधाव्या; राऊतांनी उडवली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला मोर्चा वळवला असून पुढच्या सोमवारी २७ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरेंच्या मालमत्तेची पाहणी करणार असल्याचं म्हटलं आहे. रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये बंगल्यांचा जो घोटाळा केला आहे, त्याची पाहणी मी करणार आहे असं त्यांनी … Read more

ही तर ठाकरे सरकारची दडपशाही, अशा धमक्यांना भीक घालत नाही; सोमय्यांचा हल्लाबोल

kirit somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत राज्यातील ठाकरे सरकार वर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांच्या इशारा वर माझ्यावर कारवाई झाली असून शरद पवारांचा सहभाग असल्याशिवाय हे शक्यच नाही असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या म्हणाले, ही … Read more

परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण? पडळकरांचा संतप्त सवाल

gopichand padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी परिवहन खात्यावर टीका केली आहे. परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण ? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला एकतर तुटपुंजा पगार, त्याचाही वेळेवर पत्ता नाही. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत. महामंडळाला … Read more