महाराष्ट्र विधानसभेचा आजचा दिवस ठरणार वादळी; पहा थेट प्रक्षेपण

Vidhansabha Live

मुंबई । महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरु आहे. आजचा अधिवेशनाचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात सदर अधिवेशनात विविध मुद्द्यावरून जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण आपण हॅलो महाराष्ट्र च्या युट्युब चॅनेलवर पाहू शकता. इथे खाली आम्ही सदर अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण दाखवत आहोत.

विधानसभा हिवाळी अधिवेशन थेट प्रक्षेपण | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

अध्यक्षपदाच्या निवडीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे राज्यपालांना पत्र; दिली ‘ही’ माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान काल राज्यपालांनी निवडीवर आक्षेप घेतल्याने आघाडीतील नेत्यांनीही कोणत्याही परिस्थितीत आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या निवडी करणार असे म्हंटले. अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहले आहे. विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाही, असे मुख्यमंत्री ठाकरेंनी पत्रात म्हंटले आहे. मुख्यमंत्री … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागावी अन् भाजप शिवसेनेचं सरकार पुन्हा यावं..

Uddhav Thackeray Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी चंद्रकांतदादांच्या सुरात सूर मिसळत त्यांच्या विधानाला पाठिंबा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत आशा व्यक्त केली आहे. रामदास आठवले म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रपती … Read more

दंगलीच्या रॅकेटची माहिती देणाऱ्याचा एसआयटीवरच सरकारकडून कारवाई; फडणवीसांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस पार पडला. या अधिवेशनात अमरावती येथील हिंसाचाऱ्याच्या घटनेचे पडसाद उमटले. या घटनेवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. “दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता या सरकारच्या काळात हिंसाचाराचे हे रॅकेट चालले आहे. या रॅकेटबाबत ज्या एसआयटीने अमरावतीच्या घटनेचे … Read more

उद्धव ठाकरे आजारी असल्याने फडणवीसांना मुख्यमंत्री करावे; आठवलेंची अजब मागणी

Thackeray Fadanvis Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असून अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर विरोधकांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, उद्धव ठाकरे हे आजारी असल्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाचा कारभार द्यावा असा अजब सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. मुख्यमंत्री आजारी असल्याने मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? … Read more

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांची भेट घेत त्यांना अध्यक्ष निवडीबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलण्यात आले. अध्यक्षपदाची निवड प्रक्रियाच घटनाबाह्य आहे, असे पत्राद्वारे राज्यपालांनी म्हंटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी … Read more

ठाकरे सरकारच्या गोंधळावर पीएचडी होऊ शकते; चंद्रकांतदादांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीन दिवसाच्या पार पडलेल्या अधिवेशनातील गोंधळावरून तसेच राज्यातील ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणास निवडणुकांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ठाकरे सरकावर आज निशाणा साधला. ओबीसी आरक्षणात गोंधळ, मराठा आरक्षणात गोंधळ, ठाकरे सरकारच्या गोंधळावर पीएचडी होऊ शकते,असा टोला पाटील यांनी लगावला. भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले … Read more

राज्यात ठाकरे सरकारचे कुशासन सुरू; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महाविकास आघाडी सरकावर केंद्रातील भाजप नेत्यांकडून अनेकवेळा टीका केली जाते. दरम्यान, भाजप नेते तथा माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. केंद्रामध्ये मोदी सरकारचे सुशासन आहे, तर राज्यात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे कुशासन सुरू आहे. राज्यात पोलिसच बॉम्ब पेरत असून सरकार वसुली करण्यात गुंतले आहे, अशा शब्दांत … Read more

मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपतीला पायी वारी, वाटेतच शिवसैनिकाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी बीडमधून तिरुपतीला पायी यात्रा करणाऱ्या शिवसैनिकाचा मृत्यू झाला. सुमंत रुईकर असे या शिवसैनिकाचे नाव असून बीड ते तिरुपती असा 1100 किमी पायी चालत जाऊन मुख्यमंत्र्यांसाठी साकडे घालण्याचा सुमंत रुईकर यांचा नवस होता. सुमंत रुईकर आणि त्यांच्या मित्रानं पायी चालत … Read more

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात; राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन सध्या सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्बेतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात. अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. यावेळी राणे यांनी गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर परिकर यांचा दाखला … Read more