विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी धरला ठेका, पहा व्हिडिओ

ठाणे प्रतिनिधी | आजचा दिवस महाराष्ट्रासाठी तितकाच उत्साहाचा आणि दुःखाचा देखील आहे. आजचा दिवस आहे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जड अंतःकरणाने गणपती बाप्पाचे गुरुवारी विसर्जन होत असून, विसर्जनासाठी मुंबईसह नवी मुंबईतील चौपाट्या, तलाव, कृत्रिम तलाव येथे मोठी गर्दी उसळली आहे.

विसर्जन सुरळीत व्हावे यासाठी पोलिस, महापालिका यांसह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. दरम्यान संपूर्ण राज्य लाडक्या बाप्पा ला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहे. पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या प्रमुख शहरांमध्ये प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. भाविकांना कोणत्या हि प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी कर्मचारी सज्ज झाले आहेत. तसेच यावेळी सगळीकडे कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून सर्वाना करण्यात आहे.

या सर्वांमध्ये नेहमीच धावपळीचे कर्तव्य करीत असणाऱ्या आणि सुरक्षेसाठी दक्ष असणाऱ्या पोलिसांनी देखील मिरवणुकीचा आनंद घेतला. ठाण्यातील पोलीस बांधवांनी आज अनंत चतुर्दशी च्या दिवशी बंदोबस्ताच्या पूर्वीच बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात केली. या विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलीस बांधव मोठया संख्येने सहभागी झाले आहेत. त्यांनी विसर्जनाच्या मिरवणुकीत वाद्याच्या तालावर ठेका धरला. यावेळी मिरवणुकीमधील त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. नेहमीच आपल्या कर्तव्याच्या ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी थोडा वेळ काढून सामान्य नागरिकांप्रमाणे आनंद लुटला. या आनंदात काही महिला पोलीस देखील सहभागी झाल्याचे पाहण्यात आले.

तब्बल दोन लाख 78 हजार नवसाच्या मोदकांचे वाटप

हिंगोली प्रतिनिधी | नवसाला पावणारा गणपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात ज्याची ख्याती आहे अशा हिंगोली शहरातील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रीघ लागली आहे. सकाळी भाविकांसाठी महापूजा झाल्यानंतर मंदिर खुले करण्यात आले.

विशेष म्हणजे या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवसाच्या मोदकांचे वाटप करण्यात येते. तब्बल दोन लाख 78 हजार मोदक भाविकांना वाटप करण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने तयार केले आहेत.

तसेच लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हिंगोली शहरातील नागरिकांनी जागोजागी फराळाची व्यवस्था केलेली आहे. पावसाचे वातावरण असल्याने मंदिर समितीने वॉटरप्रूफ मंदिराची देखील उभारणी केली आहे.

दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप..!

बीड प्रतिनिधी | जिल्ह्यात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येतोय. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झालीये.

परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात असणाऱ्या हरिहर तीर्थ या तलावात शहरातील गणपतीचे विसर्जन करण्यात येतंय. दुष्काळाचं सावट यंदाच्या विसर्जनावर दिसून आले, आज गणेश विसर्जन असल्याने परळी नगर पालिकेकडून टँकरच्या सहाय्याने हा तलाव भरण्यात आलाय.

जिल्ह्यावरील दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. आणि परतीचा पाऊस जोरदार पडू दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप देण्यात येतोय. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत गणेश विसर्ज सुरु आहे.

जो पर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत विसर्जन नाही, शेतकर्‍यांचे बाप्पासमोरच उपोषण

सोलापूर प्रतिनिधी | लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यासाठी राज्यभरात जोरदार जल्लोष सुरु असतानाच इकडे पंढरपूर तालुक्यात मात्र पाण्यासाठी शेतकर्यांनी गणरायापुढेच उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत नीरा कालव्यातून पाणी मिळत नाही तो पर्यंत गणपती बाप्पाचे विसर्जन करणार नाही असा पवित्रा येथील शेतकर्यांनी घेतल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून पंढरपूर,सांगोला आणि माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पाऊस नसल्याने शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे भीमा आणि नीरा नदीला पुर आलेला असतानाच दुसरीकडे मात्र याच भागातील शेतकर्यांना पाण्यासाठी गणपती बप्पासमोरच आंदोलन कऱण्याची वेळ आली आहे.

गणपती बप्पाचे विसर्जन करण्यासाठी अनेक गावात पाणीच नसल्याने गणरायाचे विसर्जन कसे करायाचे अशी चिंता देखील गणेश भक्तांना लागली आहे,अशातच आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी, उंबरगाव, कासेगाव, या भागातील शेतकर्यांनी चक्का गणरायासमोरच उपोषण सुरु केले आहे.इतकेच ऩाही तर पाणी मिळाल्याशिवाय गणरायाचे विसर्जन करणार नाही असा इशारा येथील शेतकरी सचिन ताटे यांनी दिला आहे. पाण्यासाठी गणरायाचे विसर्जन थांबविण्याची वेळ या भागातील शेतकर्यांवर पहिल्यांदाच आल्याने येथील शेतकर्यांच्या उपोषणाची परिसरात चर्चा सुरु झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

दंगल गर्ल बबिता फोगाटचा पोलिस दलातून राजीनामा, भाजपकडून लढणार विधानसभा

आता कार्ड जवळ नसेल तरीही ATM मधून पैसे काढता येणार, पहा काय आहे प्रक्रीया

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

इकडे आड तिकडे विहीर ; राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या अडचणीत वाढ

 

मुख्यमंत्री पदाबाबत रामदास आठवले यांचे मोठे विधान

मंबई प्रतिनिधी | येत्या विधानसभेत ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. तसेच भाजप पक्षालाच जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे यांची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही. जागावाटपात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं, त्यासाठी उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल असे ही ते म्हणाले.

उल्हासनगरच्या गोलमैदानात आज आठवले यांनी सभा होती.त्या वेळी सभास्थानी १०नंतर आलेल्या आठवल्यानी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा उल्लंघन करून १० वाजून २० मिनिटांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर भाषण केले.यावेळी पोलिसांनी आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

हर्षवर्धन पाटलांचं ठरलं ! ११ सप्टेंबरला करणार भाजपमध्ये प्रवेश

सेना भाजपच्या मेगा भरतीमुळे युतीच्या जागावाटपात आला आहे हा नवा सस्पेन्स

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

एकादशीला यान सोडल्यानेच अमेरिकेची मोहीम यशस्वी – संभाजी भिडे

काँग्रेस सोबत निवडणूक लढवायची की नाही या बाबत प्रकाश आंबेडकरांनी केले अंतिम विधान

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

सोलापूर प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी भाजप  आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत करत असल्याचा आरोप करून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वातील वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने वंचितमधून बाहेर पडले होते. मात्र, आता त्यांनी शिवसेना आणि आपले काही वावडे नसल्याचं म्हणले आहे तसेच ते शिवसेनेला मदत करणार असल्याचे बोलले आहे.

लक्ष्मण माने म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरे हे आमच्या चळवळीचे नेते आणि माझे गुरु होते. त्यांचा मुलगा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चूक केली. मात्र, नातवंडे सुधारत असतील तर त्यांना मदत करण्याची माझी तयारी आहे.” म्हणजेच आगामी विधानसभा निवडणुकीत ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा साथ देणार असं म्हणत आहेत.

माने यांनी सोमवारी (9 सप्टेंबर) सोलापुरात पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला मदत करणार असल्याचे म्हणाले.
[youtube https://www.youtube.com/watch?v=9TZnNiR7oFQ&w=560&h=315]

उदयनराजे कुठेही असतील, त्यांचे स्वागत करतो-छत्रपती संभाजीराजे

सोलापूर प्रतिनिधी | उदयनराजे कुठेही असतील त्यांचे स्वागत करतो, असे प्रतिपादन राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. सोलापूरात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. विधानसभेच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून राज्यात नेत्यांची जोरदार पक्षांतरे सुरु आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील अनेक वरीष्ठांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केला आहे. अजून कहीजण प्रवेशाच्या वाटेवर आहेत. खासदार उदयनराजेही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार आहेत, अशी चर्चा आहे.

[youtube https://www.youtube.com/watch?v=LTcM4fNV_BU&w=560&h=315]

याबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे यांना विचारले असता ते म्हणाले उयनराजे हे आमचे बंधू आहेत. ते कोठेही असले तरी त्यांचे स्वागत करतो. सध्याच्या पक्षांतराबाबत विचारले असता ते म्हणाले, मला राजकीय काही बोलायचे नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीने काढलेल्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेत उदयनराजे दिसले नाहीत. त्यातच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यंतरी भेट घेतली होती. त्यामुळे उदयनराजे यांच्या पक्षांतराबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली होती. उदयनराजे यांच्या राजकीय भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गड किल्ले भाड्याने देण्याबाबत आपला विरोध असल्याचे सांगत माझी भुमिका मी पेजवर स्पष्ट केली असल्याचे ते म्हणाले.