पुण्यात दिवसभरात सापडले ८२४ रुग्ण; एकुण रुग्णसंख्या २८,९६६ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुण्यात आज ४७ रुग्ण आढळून आले आहेत तर पुणे महापालिका परिसरात एकूण ५२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात आज २५७ नवीन रुग्ण आढळून आले. पुणे जिल्ह्यात एकूण ८२४ रुग्ण आढळून आले यासोबतच आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८,९६६ झाली आहे. पुण्यातील रुग्ण २४२२, महापालिका परिसरातील रुग्ण २२७५६ तर पिंपरी चिंचवड परिसरातील रुग्ण ३७८८ झाले आहेत.

आज जिल्ह्यात एकूण १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील २, महापालिका परिसरातील १३ आणि पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील २ रुग्णांचा समावेश आहे. यासोबतच पुण्यातील एकूण मृतांची संख्या ८९९ झाली आहे.

पुणे विभागात आज सोलापूर व सातारा याठिकाणी अनुक्रमे २७ व ३७ रुग्णांची भर पडली आहे. आज सोलापूर मध्ये ७ आणि सातारा जिल्ह्यात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागात एकूण ८८८ रुग्णाची वाढ झाली असून आता या विभागातील रुग्णसंख्या ३३५८१ झाली आहे. आज विभागात एकूण २८ मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत विभागात एकूण १२४४ मृत्यू झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.