मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते – चंद्रकांत पाटील 

0
58
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोरोना काळात सरकार किती निष्क्रिय आहे हे सांगण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आता त्यांनी परत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला मदत मागण्यासाठी त्यांचा इगो आडवा येतो असे वक्तव्य केले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

तुमच्यात मतभेद आहे हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची मुलगीही सांगेल यांचं काही खरं नाही. अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. करोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ते म्हणाले, लॉकडाउन की अनलॉक अजून कळत नाही. मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत. लॉकडाउनमध्ये जेवढे कडक निर्बंध नव्हते तेवढे अनलॉकमध्ये घालून ठेवले आहेत. असे म्हणत लोकांनी नेमकं काय करायचं? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

“मुंबईत एवढे मूर्खपणाचे निर्णय घेतले जात आहेत की त्यावर काही बोलायलाच नको. आजार राहिला बाजूला पण सामान्य माणूस वैतागला आहे. आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात सत्तेची हाव लागली आहे. तुमच्यात मतभेद आहेत तर आम्ही बोलायचं नाही का? असा थेट निशाणाच पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला आहे. ”मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांचा लोकांशी काहीही संबंध नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांना विचारात घेत होतो. एकट्या देवेंद्र फडणवीसांना जरी दोन तास मागितले असते तर त्यांनी सगळे प्रश्न सोडवले असते” असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here