…म्हणून अजित पवारांनी केलं होत बंड! चेकमेट पुस्तकातून धक्कादायक खुलासा

मुंबई । गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि राज्यात भाजप-शिवसेनाच्या युतीला बहुमत मिळालं होतं. पण मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेत मोठा कलह होऊन अखेर युती तुटली आणि महाविकासआघाडी जन्माला आली. पण या दरम्यान महाराष्ट्राने मोठा सत्तासंघर्ष पाहिला. या सत्तासंघर्षातील एक महत्वाचं प्रकरण म्हणजे, महाविकासआघाडीच्या बैठकांवर बैठका सुरु असताना अजित पवार अचानक भाजपच्या गोटात सामील होणं. संपूर्ण … Read more

अशा वेळी आंदोलनाचं खूळ डोक्यात आलं तरी कुणाच्या? अजित पवारांचा भाजपला सवाल

मुंबई । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले ‘काळे झेंडे’ आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री … Read more

आषाढी वारी बाबत अजित पवारांची बैठक; विश्वस्तांनी ठेवले प्रशासनासमोर ‘हे’ तीन पर्याय

पंढरपूर प्रतिनिधी । राज्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. कोरोनाचा प्रभाव आता सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरदेखील पडत आहे. आषाढी एकादशी वारी समोर कोरोनामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फेरंन्सिंगद्वारा एक बैठक घेतली असून यात वारी बाबतचा निर्णय ३१ मे रोजी … Read more

अजित पवारांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र, मजूरांना घरी जाण्यासाठी पुणे-मुंबईहून विशेष गाड्या सोडा

मुंबई | सध्या देशात सर्वत्र लाॅकडाउन आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील लाॅकडाउनचा काळ ३ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यामुळे पुणे, मुंबई सारख्या शहरांत कामानिमित्त स्थलांतरित मजूरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. हाताला काम नसल्याने खिशार पैसे नाहीत आणि पैसे नसल्याने आता खायचं काय अन् रहायचं कुठे असा प्रश्न या मजूरांच्या समोर उभा ठाकला आहे. … Read more

यंदाची आंबेडकर जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करा- अजित पवार

मुंबई । कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे. दरम्यान, त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. … Read more

पंतप्रधानांनी घरात दिवे लावायला सांगितलं होत झुंडीनं रस्त्यावर कसले येता- अजित पवार

मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री ९ वाजता लोकांना घरात दिवे लावून कोरोनाविद्धच्या लढ्यात एकजूट असल्याचं दाखवण्यास सांगितलं होत. पंतप्रधानांच्या आवाहनाला काल देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, काही अतिउत्साही नागरिकांनी रस्त्यावर झुंडीने येऊन फटाके वाजवून कालच्या उपक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयन्त केला. अशा महाभागांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ”राज्यात कोरोनारुग्णांची संख्या … Read more

करोनाविरुद्धची लढाई लवकर संपवायची असेल तर लपू नका, स्वत:हून पुढं या!- अजित पवार

मुंबई । देशात दिवसेंदिवस करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंतेत भर घालत आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास करोनाच्यादृष्टीने संशयित आहे त्यांनी आता तरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा. करोनाविरुद्धचा … Read more

कोरोनामुळं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणं हेच मोठं आव्हान- अजित पवार

मुंबई । आजच्या घडीला कोरोनाच्या संकटावर मात आणि लॉकडाऊननं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनचं राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी … Read more

करोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख देणार- अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाने हैदोस घातला आहे. असं असतानाही जीवमुठीत घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. ड्युटीवर असताना करोनामुळे दुर्देवानं मृत्यू ओढवल्यास पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एक महत्तवपूर्ण बैठक पार … Read more

नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही- अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. खबरदारी म्हणून राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केलं आहे. राज्य सरकार वारंवार नागरिकांना गर्दी न करण्याचं घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहे. मात्र, बरेच लोक अजूनही विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. गर्दी करताना दिसत आहेत. अशा वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात बेजबाबदारपणे … Read more