सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात उमेदवारांपेक्षा नोटालाच अधिक मते; निवडणुक अधिकारी पेचात

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी भाजप-काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात जोरदार लढत होत असल्याचे चित्र आहे. काही दिग्गज नेत्यांनाही आपल्या गावात हार पत्करावी लागत आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील एका गावात अजब निकाल लागल्याचे पहायला मिळत आहे. खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीत उमेदवारांपेक्षा नोटालाच अधिक मते मिळाली आहेत. सातारा … Read more

भाजपच्या दिग्गजांना धक्का ; चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंनी स्वतःच्या गावातील ग्रामपंचायती गमावल्या

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीत पराभव पत्करावा लागला आहे. तर भाजप नेते नितेश राणे आणि राम शिंदे यांच्या हातूनही ग्रामपंचायत निसटल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे कोल्हापुरातील खानापूर … Read more

कराड : नांदगाव ग्रामपंचायतीत काका बाबा गटाला धक्का; 10 वर्षांनंतर संत्तांतर, अतुल भोसले गट विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलास काका पाटील-उंडाळकर गटाला धक्का बसला आहे. दहा वर्षानंतर नांदगाव येथे सत्तांतर झाले असून भाजपच्या अतुल भोसले गटाला विजय प्राप्त झाला आहे. नांदगाव येथे सुकरे गुरुजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील … Read more

विठ्ठलवाडीत पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय; विरोधकांना भोपळा

सोलापूर | जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथे पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व 7 जागांवर एकहाती सत्ता मिळवण्यात माने – देशमुख यांच्या पॅनलला यश मिळाले आहे. विरोधकांना भोपळाही फोडता न आल्याने गावात देशमुख गटात जल्लोष साजरा केला जात आहे. विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीत युवा नेते पृथ्वीराज देशमुख यांनी आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणुक लढवणार नसल्याचा … Read more

कोल्हापुरात शिवसेनेनंही केली कमाल,जिल्ह्यातील मिणचे ग्रामपंचयातीवर शिवसेनेचा झेंडा

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांमुळे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे चित्र क्षणाक्षणाला बदलत आहे. आता हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य पाठोपाठ शिवसेनेने कमाल करुन दाखविली आहे. येथील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. याठिकाणी शिवसेनाप्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीने 13 पैकी 10 जागांवर बाजी मारली. या विजयानंतर मिणचे गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल … Read more

कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कार्वे मध्ये अतुल भोसले पॅनेलचा दणदणीत विजय

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात सगळीकडे ग्रामपंचायत निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कार्वे गावात अतुल भोसले यांचे पॅनल विजयी झाले आहे. अतुल भोसले यांच्या पॅनेलने 10/7 असा दमदार विजय मिळवला आहे. एकूण 17 वॉर्ड असलेल्या गावात अतुल भोसलेंच्या भाजपने 10 जागांवर विजय मिळवला तर कॉंग्रेसला 7 … Read more

ग्रामपंचायत निवडणुक २०२१। ….म्हणून ‘या’ गावात निकाल पाहायला गावकरीच उरले नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत देखील महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या नांदेडमधील एक गाव चांगलेच चर्चेत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत मुतण्याळ या गावातील प्रतिस्पर्धी गटांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यामुळे … Read more