रेशन कार्ड नसलं तरी राज्य शासन गरिबांना ५ किलो तांदूळ देणार- छगन भुजबळ

मुंबई । कोरोना व्हायरस आणि लॉकडाउन अशा दुहेरी संकटात हातावर पोट भरणाऱ्या समाजातील एका मोठ्या वर्गापुढे जगण्याचं मोठं संकट आहे. एकीकडे हाताला काम नाही तर दुसरीकडं काही जणांकडे सरकारी मदत घेण्यासाठी शासन दफ्तरी नोंद नाही. अशा वेळी गरिबांवर उपासमारीची वेळ आली असतांना राज्य सरकारकडून आता रेशन कार्ड नसणाऱ्यांनाही अन्नधान्याचा पुरवठा केला जाणार आहे. कोणत्याही प्रकारचं … Read more

..तर मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे ‘हा’ दुसरा पर्याय आहे- छगन भुजबळ

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, राज्याचे राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी त्यावर अद्यापही कार्यवाही न करत निर्णय घेतला नाही. जर वेळेत हा निर्णय झाला नाही, तर काय? असा प्रश्न सध्या चर्चेत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना … Read more

शिवभोजन आता फक्त ५ रुपयांत; करोनामुळं सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा बंदच्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या योजनेचा … Read more

कृपया झुंबड करू नका! राज्यात ६ महिने पुरेल इतका अन्नधान्य पुरवठा- छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी बाजारात नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. त्यामुळं करोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन भाजी बाजार, किराणा दुकानात झुंबड करू नका असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेला केलं … Read more

एखाद्याच्या पाठीत गोड बोलून खंजीर कसा खुपसायचा हे मी ‘यांच्या’कडून शिकलो असं म्हणत भुजबळांनी शिवसेना का सोडली?

छगन भुजबळ. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील ३५ वर्षांपासून आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं नाव. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायेत आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरु करणाऱ्या छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील गावागावात शिवसेना पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. असं असताना छगन भुजबळांचं शिवसेनेशी नेमकं काय बिनसलं? बाळासाहेबांना न जुमानता ते दुसऱ्या पक्षात कसे गेले? वाचा ही खास स्टोरी.

शिवभोजन योजनेला मिळाला मुहूर्त; २६ जानेवारीपासून १० रुपयात मिळणार जेवण

शिवसेनेच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ २६ जानेवारी २०२० रोजी होणार आहे.याबाबतची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. आपल्या खात्याच्या आढावा बैठकीत छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली.

छगन भुजबळांना मोठा धक्का! माणिकराव शिंदेंचा सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला पूर्णविराम मिळाल्यानंतर येवल्यातून शिवसेनेनं संभाजी पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता भुजबळांना मोठा धक्का बसला आहे. कारण, भुजबळांवर नाराज असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांच्याशी हात मिळवणी केली आहे. निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे येवल्यामध्ये राष्ट्रवादी विरोधात शिवसेनेची ताकद वाढली अशी चर्चा आहे.

नाशिकमध्ये भुजबळ पिता-पुत्रांना लक्ष्य करण्यासाठी शिवसेनेने आखली मोठी ‘रणनीती’  

नाशिक प्रतिनिधी। जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेने सर्वाधिक ९ जागांवर निवडणूक लढवत असून, या ९ जागांवरील प्रचाराचे नियोजन शिवसेनेकडून पूर्ण झाले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी, १२ ऑक्टोबर रोजी दिंडोरी, नांदगाव आणि येवला मतदारसंघांत जाहीर सभा घेणार आहेत. नांदगाव आणि येवल्यात सभा ठेवून प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात शिवसेनेने भुजबळ पिता-पुत्रासमोर दंड थोपटले आहे. … Read more

नाशिकमध्ये उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब नाहीच…

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिक मध्ये दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते. नाशिकच्या या दौऱ्यात ते आगामी निवडणुकीचे उमेदवार घोषित करतील अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र पवारांनी उमेदवारांचे नाव घोषित करण्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर दिली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत पवारांनी नाशिक येथील उमेदवार आपण ठरवू असे सांगितले होते, मात्र नाशिकची जबाबदारी छगन … Read more

छगन भुजबळ यांना केले रुग्णालयात दाखल

images

मुंबई | राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्याची आज कोर्टात तारीख होती. कोर्टात हजर होण्यासाठी ते घरातून निघाले परंतु त्यांच्या छातीत वेदना निर्माण झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. मेहता भुजबळ यांच्यावर उपचार करत … Read more