सांगली जिल्ह्यात आणखी तिघांना कोरोनाची लागण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश झाल्यानंतर प्रशासनाकडून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आज स्पष्ट झाले. सांगली मिरज आणि जत तालुक्यातील अंकलेत मध्ये आणखी तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मिरज होळीकट्टा येथील ६८ वर्षीय महिला, सांगली येथील फौजदार गल्लीतील ४० वर्षीय महिला तर अंकले येथील … Read more

मिरजेत सामुहीक नमाज पठण केल्याचा धक्कादायक प्रकार, ४१ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन मरकझ प्रकरण ताजे असताना मिरजेतील मटण मार्केट येथे बरकत मशिदीमध्ये सामुहीक नमाज पठण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना या मशिदीमध्ये सामुहीक नमाज पठण करणाऱ्या ४१ जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये माजीनगरसेवक साजिद पठाण … Read more

मिरजेत अवैध सावकारीतून कोट्यवधी रुपयांची वसुली करणाऱ्या २ फरार आरोपींना अटक

सांगली प्रतिनिधी । मिरजेतील तंतूवाद्य व्यवसायिक संजय मधुकर मिरजकर याच्याकडून ५१ लाखांच्या कर्जापोटी तब्बल दोन कोटींचे व्याज वसुल करण्यात आले. यासंदर्भात गुन्हा दाखल झालेले संतोष कोळी व गायकवाड या दोघा फरारी आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली. अन्य ६ सावकार अद्याप फरारीच आहेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या सावकरांवर … Read more

सांगलीच्या गुलाबांनी साजरा होणार दिल्ली आणि मुंबईकरांचा ‘व्हॅलेंटाईन डे’; रेल्वेने फुलांची निर्यात सुरू

सांगली प्रतिनिधी । व्हॅलेंटाईन डे साठी दिल्ली व मुंबईत डच गुलाब या हरितगृहातील फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची मोठ्याप्रमाणात निर्यात सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी मागणीमुळे डच गुलाबाचा दर चांगलाच वधारला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहात मोठ्या प्रमाणात डच गुलाबाचे उत्पादन होते. व्हॅलेंटाईन डे साठी … Read more

मिरजेत डोक्यात दगड घालून इसमाचा खून;आरोपी पोलीस ठाण्यामध्ये हजर

मिरज येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेत अनोळखी इसमाच्या डोक्यात राजू जाधव याने दगड घालून खून केला. घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या खुनातील आरोपी राजू जाधव हा स्वत: पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

न्यायालय स्थलांतरविरोधात मिरजकर रस्त्यावर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरज न्यायालय सांगलीतील राजवाडा चौकातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत स्थलांतराला मिरजेतील राजकीय व सामाजिक संघटनांनी सर्व पक्षीय मिरज न्यायालय बचाव कृती समितीच्या माध्यमातून तीव्र विरोध करत महाराणा प्रताप चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मिरज किल्ला भागामध्ये संस्थाकालिन इमारतीमध्ये न्यायालयाचा कारभार चालत असे. मिरज न्यायालयाची इमारत जीर्ण होऊन धोकादायक झाल्याच्या … Read more

‘सुरेश खाडेंना पाला पाचोळ्यासारखे मतदार उडवून लावतील’- राजू शेट्टी

‘भाजपच्या आमदारांना सत्तेचा माज आला आहे. विरोधकांना पालापाचोळा व कचरा म्हणणाऱ्या सुरेश खाडेंना मतदारच पालापाचोळ्यासारखे उडवून लावतील. त्यांची सत्तेची मस्तीच मतदारच उतरवतील’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मिरजेतील पत्रकार परिषदेत केली. यावेेळी विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, महेश खराडे, संदीप राजोबा, तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचे बोगस अर्ज देऊन मोठी फसवणूक…

Untitled design

सांगली प्रतिनिधी | मिरज तालुक्यातील बेडग येथे असलेल्या मिशन हॉस्पिटलच्या शाखेमध्ये नर्स व महिला बचत गटामार्फत रुग्णांची फसवणूक करण्यात अली आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचा बोगस अर्ज ग्रामस्थांकडून भरून घेवून त्यांच्याकडून ५० रूपांचे फॉर्म भरल्यानंतर २ लाख मिळणार असे सांगून फसवणूक केली जात होती.ग्रामस्थांना याबाबत संशय आल्याने ग्रामस्थांनी नर्स व बचत गटातील महिलांना … Read more