जनावरे चरायला घेऊन गेलेल्या शेतकर्‍याला झुडपात दिसला बिबट्याचा मृत बछडा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील धामणी गावा नजीकच्या शिवारात सोमवारी सायंकाळी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. शिवारात जनावरे चारण्यास घेवून गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. तेथील एका ओढ्याच्या काठावर असलेल्या झुडपांमध्ये बिबट्याचा बछडा मृतावस्थेत पडलेला होता.त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. दरम्याम गेल्या 6 महिन्यापासून राज्यातील अनेक … Read more

महाराष्ट्रात लोकशाही सरकार नसून ठोकशाही सरकार – चंद्रकांत पाटील

सातारा | राज्यात सध्या लोकशाही सरकार नसून ठोकशाही सरकार आहे,अशा कडक शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यमान सरकारवर निशाणा साधला आहे. आज साताऱ्यात राज्यसभा खासदार उदयराजे भोसले यांच्यासोबच चंद्रकांत पाटील यांनी अजिंक्यतारा या किल्ल्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी खास आपल्या शैलीत ठाकरे सरकारवर टीका केली. पाटील पुढे म्हणाले … Read more

साताऱ्यात चक्क मुलींची तुफान हाणामारी ; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शाळा असो वा कॉलेज, मुलांच्या भांडण्याचा किंवा राडा केल्याची घटना आपण पाहिली असेल. पण मुलांप्रमाणेच मुली सुद्धा तुफान राडा करत आहेत असं जर आपण म्हणलं तर ते काही खरं वाटणार नाही. पण साताऱ्यात कॉलेज मधील मुली चक्क राडा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स … Read more

तब्बल सहा शिवशाही बसला अचानक लागली आग; सातारा बस स्थानकात खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसना आज अचानक आग लागली. या घटनेने सातारा शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे. या दुर्घटनेनंतर एसटी स्टॅन्ड परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. अग्नीशामक दलाची गाडी घटना स्थळी दाखल झाली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. … Read more

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 15 जणांचा चावा; तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्याने गावात भितीचे वातावरण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा-जकातवाडी आणि डबेवाडी गावात अनेकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. या हल्ल्यात एकुण 15 जण जखमी झाल्याचे समजत आहे. तसेच जखमी झालेल्या 21 वर्षीय तरुणी रुपाली माने आणि 23 वर्षीय तरुण देवानंद लोंढे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. कुत्र्याच्या चाव्यात जखमी झालेल्या 5 जणांवर अजून देखील उपचार सुरू आहेत. … Read more

सातार्‍यात दोन्ही राजेंच्याविरोधात महाविकास आघाडी ठोकणार शड्डो; पालिकेच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरु

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या राजकारणात उतरून दोन्ही राजेंना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी शड्डू ठोकणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातारा पालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली आता गतिमान झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार … Read more

‘या’ तालुक्यात शिवसेना राष्ट्रवादीवर भारी; शंभुराज देसाईंची सरशी तर पाटणकरांची पिछेहाट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकिंचा निकाल आज जाहीर होत आहे. गावपातळीवर अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीही आमने सामने असल्याचे पहायला मिळाले. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातही शिवसेना राष्ट्रवादीवर भारी पडल्याचं पहायला मिळालं. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींत शंभुराज देसाईंची सरशी तर पाटणकरांची पिछेहाट झाली आहे. पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात उमेदवारांपेक्षा नोटालाच अधिक मते; निवडणुक अधिकारी पेचात

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी भाजप-काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात जोरदार लढत होत असल्याचे चित्र आहे. काही दिग्गज नेत्यांनाही आपल्या गावात हार पत्करावी लागत आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील एका गावात अजब निकाल लागल्याचे पहायला मिळत आहे. खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीत उमेदवारांपेक्षा नोटालाच अधिक मते मिळाली आहेत. सातारा … Read more

अकलूजमध्ये लडाख, हिमालयातून नवीन पाहुण्याचे आगमण; कंपन पक्षाचे सयाजीराजे पार्कमध्ये स्थलांतर

सातारा प्रतिनिधी | हिमालयाच्या पर्वतरांगेत व लेह – लडाखमध्ये मूळ वास्तव्याला असलेला थिरथिरा अर्थात कंपनपक्षी हिवाळी पाहुणे म्हणून येथील सयाजीराजे पार्कमध्ये येऊन दाखल झाल्याची माहिती पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी दिली. कंपनपक्ष्याबद्दल डॉ. कुंभार यांनी सांगितलेली माहिती अशी की, कस्तूरिका कुलातील‌ या पक्षाला इंग्रजीत रेड स्टार्ट असे नाव आहे. मे व जून महिन्यात विणीवर … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात कोंबड्यांचा मृत्यू; जिल्हाधिकार्‍यांकडून सतर्क क्षेत्र घोषीत

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खंडाळा तालुक्यातील मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले असून मृत्युचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसल्याने कोंबड्यांना कोणते आजार झाले हे अनिष्कर्षीत असल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) ता. खंडाळा येथील सर्व्हेक्षणाचे काम … Read more