सोलापूरच्या महापौरपदी ‘भाजपा’च्या श्रीकांचना यन्नम यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यांनी ‘एमआयएम’च्या शहाजीदा बानो शेख यांचा पराभव केला आहे. ओबीसी महिलांसाठी सोलापूर महापौरपद हे यंदा राखीव होतं. दरम्यान शिवसेनेच्या सारीका पिसे आणि कॉंग्रेसच्या फिरदोस पटेल यांनी अनपेक्षित माघार घेतल्याने या निवडणुकीला वेगळीच कलाटणी मिळाली. या मध्ये यन्नम यांना ५१ मते, तर शेख यांना ८ मते मिळाली. यामध्ये कॉंग्रेस आणि शिवसेना, वंचीतचे नगरसेवक तटस्थ राहिले. या निवडणुकीमुळे सोलापूर ‘मनपा’मध्ये ‘महाविकासआघाडी’चे चित्र फसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
दरम्यान महापौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी सकाळी ११.३०