पुण्यात चोरांना पाहून पोलिसांनीच काढला पळ, पहा घटनेचा CCTV व्हिडिओ

पुणे । सोसायटीमध्ये पाच फ्लॅटमध्ये चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांना पाहून गस्तीवरील पोलीसच पळून गेल्याचा प्रकार सीसीटीव्हीमुळे उघड झाला आहे. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली. औंध चोरी प्रकरणी पोलीस शिपाई अनिल अवघडे आणि पोलीस हवलदार प्रवीण गोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस खात्याची प्रतीमा मलीन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर … Read more

बस प्रवासात झालेल्या ओळखीचा फायदा घेत महिलेचे ४ महिन्यांचे बाळ पळवले; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे । पुण्यातील हडपसर परिसरातून ४ महिन्याच्या बाळाला पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बस प्रवासात झालेल्या ओळखीचा फायदा घेत आरोपी महिलेने 23 वर्षीय महिलेच्या बाळाला पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादी तरुणीचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरुन तिने ४ महिन्याच्या बाळाला घेऊन घर सोडले. लोणी गावात राहणारी महिला अहमदनगरला … Read more

नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी – सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांचे पालन केले गेले नाही तर होणार नाही अप्रेजल

हॅलो महाराष्ट्र । कामगार मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यावर, DGHS अर्थात Directorate General of Health Services ने सेफ वर्कप्लेससाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की, सामाजिक अंतर आणि कंपनीच्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असेल. यामध्ये सीसीटीव्हीद्वारे कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत, राज्यातील पहिलाचं प्रयोग

सिंधुदुर्ग ।  महिला सुरक्षेचा प्रश्न आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्हीची गरज ओळखत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्यात आला आहे. संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाला आहे. जिल्ह्यातील सीसीटीव्ही सनियंत्रण योजनेचे मंगळावीर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण … Read more

प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करणार- राजेश टोपे

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवले आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करत आहोत. कोरोनाला रोखण्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरत आहे. १० पैकी ९ रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरु करत आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. विनाकारण बाहेर फिरु … Read more

बुलडाण्यातील कंटेन्मेट झोनमध्ये ;पोलिसांवर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

बुलडाणा प्रतिनिधी । बुलडाण्यातील कंटेन्मेट झोनमध्ये सोमवारी रात्री पोलिसावर हल्ला करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघे फरार आहेत. पोलिसांवरील या हल्ल्याचा शहरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. शहरातील कंटेन्मेट झोनमधील मस्जिद परिसरात मास्क … Read more

डान्सबारच्या बाहेर पार्किंगच्या वादातून हाणामारी, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

उल्हासनगर मध्ये एका डान्सबारच्या बाहेर जोरदार हाणामारीचा प्रकार घडला आहे. डान्सबाहेरच्या बाहेर असलेल्या पार्किंगच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याचे समोर आले आहे. जवळपास ६ ते ७ जणांच्या टोळक्याने चौघांना जबर मारहाण केल्याचे उघड झाले आहे. हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.    

अज्ञानाचा फायदा घेऊन आदिवासी वृद्धाची बँकेतच केली रोकड केली लंपास

यवतमाळ प्रतिनिधी | यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील घोगुलदरा इथं वास्तव्यास असलेले लखमा कोंडेकर मारेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून पैसे काढण्याकरिता आले असता त्या बँकेतूनच त्यांचे पैसे चोरी झाले. ही सगळी घटना बँकेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की या वृद्धान एका अनोळखी इसमास पैसे काढण्याची पावती लिहून मागितली. त्यावर २ हजार रुपये … Read more