हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक आहे ; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर निवडणूकीत नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. यावेळी भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “बावनकुळेंचा हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

नागपुरात कोणताही चमत्कार घडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार, कोल्हापुरातही विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्या नंतर नागपुरात काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दरम्यान नागपुरात भाजपच्या उमेदवाराच्या विजयाबाबत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे. भाजपचे उमेदवार माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरुद्ध कोणीही निवडणुकीत उभे राहू दे. मात्र, विजय … Read more

हिंमत असेल तर फडणवीसांच्या काळातील ऊर्जा खात्याच्या कामाची चौकशी करा; चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात झालेल्या जलयुक्त शिवार योजना व ऊर्जा खात्याच्या कामाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून भाजप नेते तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागाच्या 6 हजार 500 कोटी रुपयांच्या … Read more

महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचाय; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. आघाडी सरकारमध्ये फूट पडली असल्याचीही अफवा पसरवली जात आहे. दरम्यान आज पुणे येथील कार्यक्रमात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला. “आम्ही ठरवलंय, 51 टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचाय, असे बावनकुळेंनी इशारा दिला आहे. भाजपनेते … Read more

14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून टीकास्त्र डागले जात आहे. आज केंद्रीयमंत्री नारायण राणे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टीका करण्यात आल्यानंतर भाजप नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “कोरोनाच्या काळात सर्व बंद होते. या काळात 14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? मात्र, तरीही त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री … Read more

मराठा, ओबीसी आरक्षण न दिल्यास रस्त्यावर फिरकू देणार नाही; बावनकुळेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारकडून मराठा, ओबीसी समाजाला आरक्षण देण्याबाबत चालढकल केली जात असल्याने भाजपकडूनही टीका होऊ लागली आहे. दरम्यान, भाजपचे नेते, सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “जर महाराष्ट्र सरकारने डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर सरकारच्या एकाही नेत्याला आम्ही रस्त्यावर फिरकू देणार नसल्याचा,” इशाराही यावेळी बावनकुळे यांनी दिला. … Read more

भाजपला बदनाम तर ओबीसींचा फुटबॉल केला जातोय; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाबाबत दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात बारामतीमधूनओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस व राज्य सरकारवर टीका केली. माझ्यावर सरकार पाडण्याचे आरोप करून भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे तर या राज्य सरकारच्याच मनात ओबीसींना आरक्षण … Read more

ओबीसींच राजकीय आरक्षण संपवण्याचा भाजपचाच डाव – विजय वडेट्टीवार यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्यांवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर सतत हल्लाबोल केला जात आहे.  दरम्यान, भाजपचे नेते सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे  यांनी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यावर टीका करीत यातील कुणीतरी झारीतील शुक्राचार्य आहेत,” असे म्हंटले होते. त्याला राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर … Read more

शरद पवार – उद्धव ठाकरे झारीतील शुक्राचार्य; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्यांवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर सतत हल्लाबोल केला जात आहे.  दरम्यान, आज भाजपचे नेते सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे  यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. “ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यांवर छगन भुजबळ मोर्चे काढतात. मात्र, मुख्यमंत्री आणि शरद पवार काही बोलत नाहीत. यातील कुणीतरी … Read more