देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील- आरबीआय गव्हर्नर

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं असून अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असं ते म्हणाले. भारतीय बाजारातील मागणीत प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. बाजारात मागणीच नाही आहे असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे … Read more

भारताने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत इटलीलाही टाकले मागे; मागील २४ तासात सर्वाधिक रुग्ण सापडले

नवी दिल्ली । देशात दोन महिन्याच्या कडक लॉकडाऊननंतरही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ९ हजार ८८७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी कोरोनाचे जवळपास १० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोना … Read more

धक्कादायक! देशभरात मागील ४ दिवसांत ९११ जणांचा कोरोनाने मृत्यू

नवी दिल्ली । कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढताना दिसत आहे. यामागचे कारण म्हणजे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन मागील ४ दिवसांत ९११ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर १ हजार जणांच्या मृत्यूची नोंद होण्यासाठी ४८ दिवस लागले होते. तिथे ही संख्या आता गेल्या ४ दिवसांत … Read more

बीडमध्ये कोरोनाच्या भीतीमुळे 65 वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

बीड । संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. वृत्तवाहिन्या, स्मार्ट फोन वर येणाऱ्या कोरोना संबंधीच्या बातम्या यातून काही जण सतर्क होत आहेत तर काही भयग्रस्त होत आहेत. लोकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण होण्याचं दुसरं कारण म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास सामाजिक बहिष्कार होण्याची भीती. त्यातून अनेकांच्या मनात या कोरोनाविषयीचा भयगंड निर्माण झाला आहे. अशातच कोरोनाला … Read more

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झाली मोठी वाढ

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या Unlock 1 धोरणातंर्गत शुक्रवारपासून देशातील अनेक व्यवहार पुन्हा सुरु होत असतानाचा कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला नाही आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९८५१ नवे रुग्ण आढळून आले. तर २७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे आता देशात प्रत्येक दिवशी … Read more

मुंबईकरांना दिलासा..!! महापालिका क्षेत्रातील लोकांना जिल्ह्यांतर्गत प्रवासास परवानगी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाचव्या टप्प्यातील संचारबंदीचे शिथिल केलेले नियम केंद्र सरकारने ३१ मे रोजी जाहीर केले होते. व राज्यांना त्यामध्ये स्वातंत्र्य दिले होते. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे राज्य सरकारने हे नियम आज (गुरुवारी) जाहीर केले आहेत. यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यातील आर्थिक घडामोडीही सुरु करण्याच्या दृष्टीने काही नियमांमध्ये सुधारणा केली आहे. मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत महानगर पालिकेच्या … Read more

पत्रकारांनाही 50 लाखांचं विमा कवच, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

बुलडाणा । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या कठीण परिस्थितीतही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींमध्ये पत्रकारांना सुद्धा विमा कवच मिळणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यातील … Read more

Swiggy आता ‘या’ राज्यातही करणार दारुची ‘होम डिलिव्हरी’

नवी दिल्ली । लोकप्रिय ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Swiggy ने झारखंड आणि ओडिशानंतर आता पश्चिम बंगालमध्येही मद्याची ‘होम डिलिव्हरी’ सुरू केली आहे. पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि सिलीगुडी या दोन शहरांमध्ये सुरुवातीला ही सेवा सुरू होत असून लवकरच राज्यातील अन्य शहरांमध्येही घरपोच मद्यविक्री सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दुकानांवरील गर्दी कमी … Read more

चिंताजनक! राज्यात ३५०० पेक्षा जास्त कोविड योद्ध्यांना कोरोनाची लागण

मुंबई । राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक झपाट्यानं वाढत असताना आता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. राज्यात एकूण ५०० डॉक्टरांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ५ डॉक्टरांचा करोनामुळं मृत्यू झाला असल्याची माहिती. महाराष्ट्र मेडिकल परिषद व इंडियन मेडिकल असोसिएशननं दिली आहे. तसेच जवळपास ३ हजार ५०० पेक्षा जास्त कोविड योद्ध्यांना कोरोनाची लागण झाली … Read more

आता खासगी कार्यालयेही सुरु होणार; राज्य सरकारने दिली परवानगी

मुंबई । लॉकडाउनमधून शिथीलता देण्यास आता सुरुवात करण्यात आली असून राज्य सरकारने खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यासंबंधीचा आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. या आदेशात खासगी कार्यालयं १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी याच्यासोबत कामकाज सुरु करु शकता असं सांगण्यात आलं आहे. ८ जूनपासून हा आदेश लागू होणार आहे. या आदेशानुसार … Read more