अतीत येथे प्लास्टिक रिसायकलिंग कंपनीस भीषण आग

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील अतीत येथील समर्थगाव मधील प्लास्टिक रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीस भीषण आग लागण्याची घटना रविवारी दुपारी घडली. सुदैवाने कामगारांना सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. अतीत समर्थगाव येथे अमेझिया व्हिजन इन्व्हायरमेंटल प्रा.ली. ही कंपनी आहे. या कंपनी भंगारातील प्लास्टिकवर रिसायकलिंग करण्याचा प्लान्ट आहे. या … Read more

कापड मार्केटला आग लागल्याच्या अफवेने नागरिकांची पळापळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज मार्केटमध्ये अचानक दिसू लागलेला धुरांचा लोट, कापड मार्केटला आग लागल्याची आलेली बातमी आणि नागरिकांची झालेली गर्दी. अशातच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या … मात्र प्रत्यक्षात पाहिले तर काय भुईकोट किल्ल्याच्या खंदकात आग… अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी ही आग अटोक्यात आणली. मिरज मार्केटमध्ये सर्वत्र धुरीचे लोट दिसत होते. एकीकडे … Read more

पेट्रोलने भरलेल्या ट्रक शेजारी चालती दुचाकी पेटलीे अन् त्यानंतर.. पहा CCTV फुटेज

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील पोवई नाक्यावरील रेणूका पेट्रोल पंपावर एका दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. त्यावेळी तेथील कर्मचारी जावेद शेख याने घटनेचे गार्भिय ओळखून फायरचा सिलेंडर फोडून आग विझविली‌. कर्मचाऱ्यांच्या प्रसंग सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. कर्मचारी जावेद शेख याच्या धाडसाचे कौतुक करीत पंपाचे मालक रितेश रावखंडे यांनी … Read more

ऊसतोडणी सुरु असतानाच मशीनला लागली आग, मशीनसह तब्बल तीस एकर ऊस जळून खाक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे गेल्या आठवड्यात बागणी येथे ऊसतोडणी मशीन जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच आज आष्टा येथे ऊसतोडणी मशीन जळाले. आष्टा येथे श्री दत्त इंडिया वसंतदादा कारखाना यांच्याकडून परिसरात ऊस तोडणी सुरू होती. ऊस तोडणी मशीनला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने मशीन संपूर्ण मशीन जळून खाक झाले. यामध्ये सुमारे साठ लाखाचे नुकसान … Read more

मुंबईतील ताडदेव परिसरातील कमला इमारतीला आग; 15 जखमी तर 2 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग लागली असल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी लागलेली आग ही लेवल 3 स्वरूपाचं असून अग्निशमन बचावकार्य करत आहे. या घटनेत 15 जण जखमी झाले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी … Read more

100 एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी, अचानक लागलेल्या आगीमुळे लाखोंचे नुकसान

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे वाळवा -बावची रस्त्यावरील ओढयालगतच्या शेतातील उसाला अचानक लागलेल्या आगीमुळे सुमारे १०० एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडूनलाखोरुपयांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले. ओढयापासून सुमारे ५०० मीटर अंतरावरील मुख्यरस्त्यालगतच्या शेतातील विजेच्या तारांमुळे शॉर्टसर्कीट होऊन खालील ऊसाने पेट घेतला असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या भागात सर्वत्र ऊसशेती असल्याने गळीतास जाणाऱ्या ऊसाचे मोठे … Read more

सातारा पोलिस दलातील पती- पत्नी भडका उडाल्याने आगीत होरपळले

fire

सातारा | सातारा पोलिस मुख्यालयासमोर असलेल्या सिटी पोलिस लाईनीत बुधवारी सकाळी घरामध्ये आग लागून पोलिस पती व पत्नी असलेले दाम्पत्य भाजले. या घटनेत महिला पोलिस गंभीर जखमी असून अधिक उपचारासाठी त्यांना पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार भडका झाल्याने ही घटना समोर आल्याचा प्राथमिक जबाब महिला पोलिसाने दिला आहे. महिला पोलिस संगिता … Read more

शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दहा एक्कर मधील ऊस जळून खाक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे बहे येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे फारणेवाडीच्या शेतकऱ्यांचा दहा एकर ऊस जळाला. आडसाली ऊसाचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी- दुपारी 1 च्या दरम्यान बहे येथील जाधव मळी भागात शॉर्टसर्किटमुळे स्पार्फकिंगने आग निर्माण झाली. क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीत पाच शेतकऱ्यांचा ऊस … Read more

सातारा शहरातील तामजाई नगरमधील अपार्टमेंटच्या फ्लॅटला भीषण आग

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सातारा शहरातील तामजाई नगर मधील श्री नगरी येथील शिवामृत अपार्टमेंट मध्ये रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटला भीषण आग लागली. विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून काल हे कुटुंब परगावी गेले आहे. यामध्ये फ्लॅट मधील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे. याबाबत अधिक … Read more

नारेगावात अग्नितांडव ! 3 दुकाने जळून खाक

fire

औरंगाबाद – नारेगावातील फर्निचरच्या दुकानाला काल सायंकाळी लागलेल्या आगीने भीषण रूप घेत अन्य तीन दुकाने जळून राख झाली. अग्निशामन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने अखेर आग आटोक्यात आली. या आगीत पत्राचा शेड मधील छोट्या उद्योगांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. नारेगाव परिसरात सोफे व सुटकेस बॅग तयार करणारे दुकान, चिवडा तयार करणारी … Read more